मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पद्मदुर्ग जागर व भ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकुर यांनी नाराजी दर्शवली आहे. समुद्राच्या लाटेनी किल्ल्यांची भितीची पडझड सुरू आहे. याकिल्लाची अवस्था बिकट झाली आहे तरी ही या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना या किल्ल्याकडे लक्ष देता येत नाही.
जतन व संवर्धन करिता निधी ही उपलब्ध करून दिली जात नाही. समुद्रात काही अंतरावर असणाऱ्या जंजिरा किल्ला संवर्धन आणि जतन करिता निधी उपलब्ध करून दिला जाते. या निधीतून दर वर्षी या किल्ल्याची पुरातत्व विभागाकडुन स्वच्छता, जतन संवर्धन केले जाते. परंतु राजे शिवरायाचा पद्मदुर्ग किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकुर यांनी नाराजी व्यक्त करुन म्हणाले की महाराष्ट्र राज्य हा राजे शिवरायाचा आहे.
महाराष्ट्रातील शिवरायाचे किल्ले संवर्धन व जतन केले पाहिजे तरच शिवरायांना खरी आदरांजली होईल. परंतु येथील राजकीय नेते निवडणूकीच्या वेळी शिवरायांच्या नावाने मत मागतात. किल्लात येऊन फक्त फोटोसेशन करून एवढी निधी देऊ उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले जाते. परंतु आश्वासनाची पुर्तता कधी होणार? हा प्रश्न आमच्या शिवप्रेमीना पडला आहे. आमच्या संस्थे मार्फत दोनदा किल्लाची स्वच्छता केली जाते.
अजुन कीती वेळ घेणार या किल्ल्याच्या संवर्धनासाठी असा प्रश्न शिवप्रेमी विचार आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकारने सांगु टाकावं की या किल्ल्याकरिता निधी उपलब्ध होणार नाही. आम्ही स्वतः व शिवप्रेमी कडुन पैसा गोळा करु आणि किल्लाची डागडुजी करू फक्त पुरातत्व विभागाने आम्हाला परवानगी द्यावी अशि प्रतिक्रिया पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशीलकुमार ठाकुर यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीवर धाक बसावा म्हणून या किल्ल्याची बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्ग किल्ल्यांपैकी पद्मदुर्ग किल्ला महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी काही जलदुर्ग बांधले त्यापैकी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला, कोलबा किल्ला हे आहे.
मुरुड जंजिरा किल्ल्या वरून पद्मदुर्ग कडे जाण्यासाठी आपल्याला बोट मध्ये जावे. जवळ असलेल्या जंजिरा किल्ला मुळे सिद्दी अतिशय प्रबळ झाला होता. सिद्धीच्या आरमारीच्या सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला होता. सिद्धीच्या अत्याचाराला थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूडच्या समुद्रामध्ये कासव आकाराच्या असलेल्या बेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. पद्मदुर्ग किल्लाचे दुसरे नाव कासा किल्ला असे पण म्हणतात.
पद्मदुर्ग किल्ल्याचे बांधण्याचे काम १६७६ मध्ये झाले. पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. पद्मदुर्ग किल्ल्याचे दोन भाग आहेत एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट असे आहे.
पडकोट मोठ्याप्रमाणावर नाहीसा झालेला परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तम पणे चांगली आहे. पडकोट हा शत्रूला चकवण्यासाठी बांधला गेलेला आहे. पद्मदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरला आहे, परंतु साडेतीनशे वर्षापासून असलेले दगड सागराच्या खाऱ्या पाण्याने तटबंदीचा दगड एकदम भिजून गेला परंतु चुना अजूनही चांगला आहे.
जलदुर्ग संवर्धनची वाट
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग पण आपल्याला चकित होण्यासारखे आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे दिसून येतो. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे. आस हा जलदुर्ग संवर्धनची वाट पाहत आहे, रायगडच्या लोकप्रतिनिधींनी मनापासून प्रयत्न केले तर किल्लाला पुन्हा जेणे वैभव प्राप्त होईल.