उरण ः उरण मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे उरण तालुक्यात भातशेतीला सुरळीच्या आळीचा घोका निर्माण झाला आहे. त्यातच तालुक्यात भातशेती आडवी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील शेतकरी - चिंतातूर होऊ लागले आहेत.
यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने दडी मारल्याने उष्णता वाढली होती, तर सध्या सततच्या पावसामुळे भातशेतीला उष्णता मिळत नसल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मे महिन्यात झालेल्या पावसात शेतकर्यांच्या पेरण्या वाया गेल्या. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. तर दुसरीकडे शेतकर्यांनी मेहनतीने उभे केलेले पीक सध्या पावसामुळे धोक्यात आले आहे. यावाचत शासनकृषी सहाय्यकांचे औषध फवारणी करण्याचा विचार करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
उरण तालुक्यात आजहीपद्धतीने भातशेतीकेली जाते. मात्र, पावसामुळे काही ठिकाणी खरीप हंगामातील भातपेरणी हवी तशी न झाल्यामुळे भाताची रोपे उगवलीच नाहीत, मूळयंदा पावसाला में महिन्यात सुरुवात झाल्याने पेरणी वाया गेली. भातरोपे तयार न होताच बियाणे कुजून गेले. असे असतानादेखील येथील शेतकर्यांनी दुबार पेरणी केली. मात्र, पाऊस थांबत नसल्याने भात बियाण्यांची पिके कुजून गेली. सतत मुसळधार कोसळणार्या पावसाने गारवा निर्माण झाला आहे. याचा परिणाम भातपिकांवर होत आहे.
शेतात पाणी साचून राहिल्याने भातपिकावर सुरळीच्या अळी पडत असेल, तर कृषी सेवा येथूनथ् अषध घेऊन त्यांची मात्रा ठरावीक प्रमाणात देण्यात यावी, यासाठी उरण तालुक्यातील विरनर ग्रामपंचायत कार्यालयात तवत्ता लावण्यात आला आहे.सुषमा गायकवाड, कृषी सहाय्यक, चिरनेर