बाळाच्या आडून नायजेरियन महिलेची 35 कोटींची ड्रग्ज तस्करी pudhari photo
रायगड

Drug trafficking case : बाळाच्या आडून नायजेरियन महिलेची 35 कोटींची ड्रग्ज तस्करी

अमलीपदार्थ नियंत्रण विभाग बंगळुरूच्या विशेष पथकाने पनवेल येथे केली अटक

पुढारी वृत्तसेवा
पनवेल ः विक्रम बाबर

आपल्या बाळाला सोबत घेवून त्याच्या फूड पॅकेट्समध्ये ड्रग्ज लपवून, साळसुदपणे आपल्या बाळाच्या आडून ड्रग्जची बेकायदा तस्करी करणार्‍या नायजेरीयन महिलेस पनवेल रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता अमलीपदार्थ नियंत्रण विभाग बंगळुरूच्या विशेष पथकाने पनवेल येथे येवून अटक केली असून तिच्याकडून 35 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

ही महिला मंगला एक्सप्रेसमधून फरिदाबाद ते पनवेल असा प्रवास करुन पनवेल येथे पोहोचली असता, या प्रवासा दरम्यान तिच्या मागावर असलेल्या बेंगळूरु एनसीबीच्या विशेष पथकाने तीला पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये ताब्यात घेतले. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा वापर करून ड्रग्ज तस्कर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची वाहतूक करत असल्याचे या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मुंबई व पनवेल परिसर बेकायदा ड्रग्ज तस्करीसाठी एक केंद्र बनत असल्याचे समोर येत असल्याने सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

यापूर्वीही पनवेल, वाशी आणि खारघर परिसरातून अशा कारवायांमध्ये आरोपी पकडले गेले आहेत.दरम्यान, प्राथमिक तपास पूर्ण झाल्यावर आरोपी नायजेरीयन महिलेला ठाणे येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT