Neral Crime News Pudhari
रायगड

Neral Crime News: वंजारपाडा येथे एकावर तलवारीने जीवघेणा हल्ला; आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

घटनेनंतर परिसरात तणाव

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील वंजारपाडा गावातील एकावर तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यातील आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर न्यायालयानी सदर आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील वंजारपाडा येथील गणपती मंदिराजवळील नाका परिसरात फिर्यादी महिला, हल्ल्यातील जखमी इसम व आरोपी हे सर्वजण वंजारपाडा गावातील रहिवासी आहेत.

या हल्ल्यातील जखमी इसम हा फिर्यादी महिलेचा भाऊ आहे. संबंधित जखमी इसम हा घराबाहेर बसला असताना, हल्ल्यातील आरोपी हा तेथे येऊन विनाकारण शिवीगाळ करू लागला. यावेळी फिर्यादी महिलेने मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करत दोघांनाही घरी जाण्यास सांगितले.

मात्र, याचा राग मनात धरून आरोपी याने घरी जाऊन तलवार घेऊन परत आला व फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्ल्यातील जखमी इसम हा मोटारसायकलवरून घरी जात असताना, आरोपीने त्याचा पाठलाग करून, त्याच्या डोक्यात तलवारीने वार केला. या हल्ल््यात सदर इसम हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात फिर्यादी महिलेने नेरळ पोलीस ठाण्यात या घडलेल्या घटने संदर्भात तक्रार दाखल केली असता, नेरळ पोलीस ठाण्यात सदर हल्ला करणाऱ्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक करून, न्यायालयामध्ये हजर केले असता, न्यायालयाने सदर आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोसई भास्कर गच्चे करीत आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने सध्या परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT