रायगड

Ambenali Ghat alternative road : आंबेनळी घाटाला पर्यायी रस्त्याची गरज

अतिवृष्टीमुळे अनेकदा मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना, मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा
पोलादपूर ः समीर बुटाला

मुंबई - गोवा महामार्गाला जोडणारा पोलादपूर - महाबळेश्वर रस्ता अति पावसाचे प्रमाण असल्याने बर्‍याच वेळा पावसाळ्यामध्ये पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रस्ता जास्त काळ बंद असतो. पावसाळ्यात इकडून प्रवास करणे धोकादायक गेल्या अनेक वर्ष या रस्त्याला पर्यायी रस्त्याची गरज असल्याचं वृत्तपत्रातून वृत्त प्रसिद्ध करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

आंबेनळी घाटाला पर्यायी रस्त्याची गरज असल्याचं अनेक वेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या लक्षात आणून सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले अशी माहिती माजी सरपंच प्रकाश कदम यांनी दिली

पितळवाडी, केवनाळे, आंबेमाची , चिरेखिंड रस्ता आंबेनळी घाटाला पर्याय रस्ता म्हणून देण्यात यावा अशी मागणी तत्कालीन आमदार व मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याकडे केली होती. त्यानुसार पितळवाडी केवनाळे, आंबेमाची चिरेखिंड हा पर्याय रस्ताचे काम सुरू करण्यात आले. मात्र निधी अभावी तो पूर्णत्वास गेला नाही. कच्चा स्वरूपात हा रस्ता तयार झालेला आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात निधी टाकल्यास हा रस्ता आंबेनळी घाटाला एक पर्यायी रस्ता म्हणून होऊ शकतो . आज जर या रस्त्याचे काम सुरू झाले असते तर सातारा कडे जाणारी वाहतूक पुणे ताम्हणे किंवा कराड मार्गे फिरवायला लागली नसती असे कदम यांनी सांगितले.

गेले अनेक वर्ष कूडपण ग्रामस्थ या रस्त्याची मागणी करत आहेत या रस्त्याचेसुध्दा काम चालू झाले आहे मात्र ते धीम्या गतीने चालू आहे मात्र तो पूर्णत्वाकडे जाण्याचा लक्षण अजूनही दिसत नाही हा रस्ता झाल्यास महाबळेश्वर कडे येणारे अनेक पर्यटक प्रतापगड कडे येतात त्याप्रमाणे जर हा मार्ग झाल्यास सुप्रसिद्ध असणारी भिमाची काठी पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील पर्यटक नक्कीच कूडपणला भेट देतील कुडपणची पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख झाल्यास त्याचा फायदा स्थानिकांना होऊन त्यांना रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागेल.

अजून एक पर्यायी मार्ग म्हणून पश्चिम घाटाला जोडणारा शिवकालीन मार्ग म्हणजे आड किनेश्वर जुने राम वरदायिनी मंदिर ते पार महाबळेश्वर रस्ता हा रस्ता शिवकाळामध्ये अस्तित्वात होता पश्चिम घाटाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक या रस्त्याने होत होती हा शिवकाळातील रस्ता आजही आपला अस्तित्व राखून आहे या रस्त्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड व महाबळेश्वर यांच्याकडे मंत्री महोदय भरत शेठ गोगावले यांनी पत्राद्वारे केले आहे.

रस्त्याचा आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली असून त्याबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचललेले दिसत नाही हा रस्ता झाल्यास पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याला पर्याय रस्ता होऊ शकतो साधारणता दीड ते दोन किलोमीटर चा रस्ता हा बाकी आहे कारण किनेश्वर गायमुखापर्यंत आता रस्ता पोलादपूर कडून घेण्यात आलेला आहे महाबळेश्वर कडून पार मार्गे जुने वरदायनी मंदिर पर्यंत रस्ता पक्क्या स्वरूपात झालेला आहे. साधारण दीड ते दोन किलोमीटर चा रस्ता झाल्यास हा रस्ता महाबळेश्वर रस्त्याला आंबेनळी घाटाला पर्याय रस्ता म्हणून उपलब्ध होऊ शकतो.

तर कुडपणचा विकास शक्य

या रस्त्याला अनेक पर्याय रस्ते सुचवलेले आहेत. त्यामधील पोलादपूर- कुडपण- कोंडोशी - कुमठे वाडा कुंभरोशी मार्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा व सातारा आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा पर्यायी रस्ता होऊ शकतो. या रस्त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे कुडपण गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होईल. पावसाळ्यात काश्मिरची आठवण देणार कुडपण गाव विविध निसर्गसौंदर्याने नटलेलं धबधब्यांच्या प्रवाहात खुलणारा कुडपण गाव सर्वांना पाहता येईल.

आंबेनळी घाटात रस्ता बंद झाल्याचे प्रकार घडल्यास हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरला जाऊ शकतो . त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी रायगड व सातारा जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी यांनी एकत्रित येऊन या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT