Crime News file photo
रायगड

Panvel news: 'पोटात दुखतंय मम्मी' चिमुकली रडत घरी आली; कामोठ्यात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर स्कूलबस चालकाचा लैंगिक अत्याचार

कामोठे परिसरात शाळेतून स्कूलबसने घरी जाणाऱ्या अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : विक्रम बाबर

कामोठे परिसरात शाळेतून स्कूलबसने घरी जाणाऱ्या अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने स्कूलबसच्या चालकाने आपल्यासोबत केलेल्या कृत्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्याचबरोबर त्या कृत्यामुळे तिच्या 'पोटात दुखत' असल्याचेही तिने सांगितले. चिमुकलीचे बोलणे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्कूलबस चालकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्को आरगुम यादव (वय ३०) असे बस चालकाचे नाव आहे. पीडित चिमुकली कामोठे सेक्टर ३६ येथील शाळेत शिकते. २ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती स्कूलबसने घरी जात होती. त्यावेळी स्कूलबस चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घरी आल्यानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार घरातील सदस्यांना सांगितला. तिच्या तोंडून हा प्रकार ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यातच कृत्यानंतर पोटात दुखत असल्याचे चिमुकलीने सांगितल्याने कुटुंबीय अधिकच हादरले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी कामोठे पोलिसांनी स्कूलबस चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पीडितेचा जबाब, वैद्यकीय तपासणी तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, एवढ्या लहान मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्कूलबस चालकाकडूनच असा गंभीर प्रकार घडल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्कूलबस चालकांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासली जाते का आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात का, असा प्रश्नही या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT