मुंबई ः केंद्रीय नागरी उडयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देताना शिष्टमंडळ. pudhari photo
रायगड

Murlidhar Mohol : नवी मुंबई विमानतळाला ‘दिबा’ यांचेच नाव देणार

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव दोन्ही विधिमंडळानी पास करून केंद्राला पाठविला आहे. त्यामुळे नाव तर दिबांचेच देणार अन्य नावाचा विचारही नाही, असे ठाम आश्वासन केंद्रीय नागरी उडयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी येथे दिले.

राजेश गायकर (कामोठे) विनोद म्हात्रे (जासई) किरण पवार ( कोल्ही कोपर ) शरद ठाकूर (धुतुम) यांनी गुरुवारी केंद्रीय उडयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांची विमानतळ नामकरणाबाबत मुंबई येथे भेट घेतली. लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याबाबत राज्य शासनाचा ठराव नागरी विमान उड्डयन मंत्रालयात पाठवण्यात आला. मात्र विमानतळ सुरू होण्यापूर्वी सदर नामकरणाची घोषणा कधी होणार हे जाणून घेण्यासाठी या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्यांची भाजप प्रदेश मुख्यालयातील जनता दरबारात भेट घेतली.

विनोद म्हात्रे यांनी याबाबतचे एक निवेदन केंद्रीय मंत्र्यांना दिले. त्यावर राजेश गायकर यांनी नामकरणाची घोषणा कधी होईल, याबाबत केंद्रीय मंत्र्यांना विचारणा केली. यावर मंत्री महोदयांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून केंद्रीय कॅबिनेटकडे सदरचा प्रस्ताव पाठविला असून केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळताच तो आमच्या मंत्रालयाकडे परत येईल, त्यानंतर याबाबतची घोषणा होईल, असे सांगितले.

विनोद म्हात्रे यांनी यावर विमानतळास अन्य नावाचा विचार होतोय का? अशी चर्चा काही लोक करीत असल्याचे सांगितले. यावर केंद्रीय मंत्र्यांनी दिबा पाटील यांच्या नावा व्यतिरिक्त अन्य कुठल्याही नावाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून आलेला नाही आणि केंद्राकडून अन्य कुठल्याही नावाचा विचार नसल्याचे त्यानी यावेळी उपस्थितांना ठामपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT