प्रातिनिधीक फोटो AI genreted  
रायगड

Navi Mumbai Accident | कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकांना केले रेस्क्यू

सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास घडली धक्कादायक घटना

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2, प्लॉट नंबर 12 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला.

घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

अग्निशमन विभागाने एकूण 12 विद्यार्थी आणि 1 शिक्षिका अशा 13 जणांना सुरक्षित बाहेर काढले. यापैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मनीष मसे (वय 14) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी मनपा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आराध्य धनवडे (सुखरूप असून नातेवाईक घरी घेऊन गेले आहेत) तर कुलसुम खान वय 13 वर्ष  याला उपचारासाठी ऍसलोन हॉस्पिटल कोपरखैरणे या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. तर पार्थ खैरनार वय 12 वर्ष  हा रूम नंबर 102 पहिला मजला येथे राहणारा मुलगा यांना साईज्योत हॉस्पिटल, कोपरखैरणे या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये मनीष म्हसे या 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नवी मुंबईच्या महापौर सौ सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून तळ नागरिकांना धीर दिला असून रुग्णालयासही भेटी दिल्या. 

सदर इमारत पूर्णतः खाली करण्यात आली असून आयुक्त यांच्या निर्देशानुसार तेथील रहिवाशांची तात्पुरती निवास व्यवस्था अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक भवन कोपरखैरणे या ठिकाणी विभाग कार्यालयामार्फत करण्यात आलेली आहे.  सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे :

सिद्धांत गुप्ता (वय 8)

प्रिन्स सोनी (वय 11)

आयशा

कुसुम (वय 15)

निष्का धनवाडे (वय 14)

मनीष मसे (वय 14)

आराध्या बोडसे (वय 14)

तन्वी श्रीवास्तव (वय 7)

देवांश पुजारी (वय 12)

राजदीप वानखेडे (वय 10)

पार्थ खैरनार (वय 14)

रुद्र येलूरकर (वय 5)

शिक्षिका शामली चौधरी (वय 53) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT