पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये, विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या युवक-युवतींमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच विविध महाविद्यालयांमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
युवतींमध्ये ‘माझे पहिले मत माझा आवाज’ या संकल्पनेवर आधारित मतदार जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विविध महाविद्यालयात परिसंवादांमध्ये मतदानाचा अधिकार, लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व, सजग व जबाबदार मतदाराची भूमिका तसेच निर्भय व प्रामाणिक मतदान करण्याचे कर्तव्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पिल्लई महाविद्यालय येथे मतदान जनजागृतीसाठी नुकतेच परिसंवाद व वॉकेथाॉनचे आयोजन करण्यात आले. या वॉकेथाॉनच्या माध्यमातून “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानचा हक्क बजावावा“ हा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. या उपक्रमांमुळे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.