murud garambi dam tourism development pudhari photo
रायगड

Murud garambi dam tourism development : मुरूड तालुक्यातील गारंबी धरणाचा पर्यटन दृष्टीने विकास व्हावा

ऐतिहासिक नबाबकालीन धरून; पूर्वी मुरूड शहराला व्हायचा पाणीपुरवठा; पर्यटकांसाठी बनतेय आकर्षणाचे ठिकाण

पुढारी वृत्तसेवा

मुरूड जंजिरा : सुधीर नाझरे

मुरूड हे पर्यटन स्थळ असल्याने समुद्रकिनाऱ्यासोबत गारंबी धरण व जंगल फिरण्याचा पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी गारंबी धरणाचा पर्यटन विकास व्हावा अशी मागणी केली अनेक वर्ष होती परंतु पूर्वी मुरूड शहराला फक्त गारंबी धरणातून पाणी पुरवठा होत असे. आजची परिस्थिती वेगळी आहे. मुरूड शहरासाठी खरआंबोली धारण झाल्याने गारंबी धरणावर अवलंबून नाही. पावसाळी गारंबी धरणाचे फुकट जाणारे पाणी भुशी डॅमप्रमाणे पर्यटन वाढीसाठी वापरण्यात यावे अशी पर्यटकांची मागणी वाढत आहे.

गारंबी धरणाला इतिहास आहे. जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विकास करणारे सर सिद्दी अहमदखान यांनी व्हिक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गारंबीच्या जंगलातील धरणास "व्हिक्टोरिया ज्युबीली वॉटर वर्क्स" हे नाव दिले. विपुल वनस्पती नैसर्गिक पाणी अडवून बांधलेले हे धरण गारंबी धरण म्हणून प्रसिद्ध आहे. शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरून पूर्णपणे नैसर्गिक प्रवाहाच्या वेगाचा वापर करून केले जाते.

पावसाळ्यात पर्यटक पाण्याच्या प्रवाहात डुबण्यासाठी हमखास या ठिकाणी जातात. वन-भोजनासाठी हे ठिकाण आदर्श आहे. पाण्याचा मूळ प्रवाह दूषित न करण्याचे सामंजस्य बाळगून निसर्गाचा आनंद घेण्यास कोणतीच हरकत नाही. दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाटा, चहुबाजूंस प्रचंड वृक्षराजी मोठे खडक, वाहत्या पाण्याची गाज, पक्ष्यांची किलबील यामुळे पर्यटक गारंबी परिसरात खिळून जातो.

मुरूड गारंबी मार्गे रोहा रास्ता झालयाने पुणे कोल्हापूर परिसरातील पर्यटक ह्या जंगल मार्गे आनंदाने प्रवास करतात .हामार्ग वळणदार आहे. पावसाळ्यात सर्व परिसर हिरवाईने नटलेला असतो. हल्ली पर्यटकांना पावसाळ्यात भिजण्याचा व पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ठिकाण पाहिजे असतं. जर गारंबी धरणाचा विकास झाला. तर मुरूड शहरातील बेरोजगारोंना काम मिळेल. नोव्हेंबर महिन्यापर्यंत या धरणातून पाणी वाहत असते.

गारंबी धरणाचा पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने मूळ धरणाला हात लावणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्याने धरणातून फुकट जाणारे पाणी धरणाखाली नागशेत गावाजवळची दरीतून वाहते येते. २ डोंगर जर उंच बंधारा बांधून भुशी डॅमप्रमाणे पायऱ्या केल्या तर पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. परिसरातील गावाना व्यवसाय मिळेल. आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून नूतन प्रस्ताव शासनाला देण्यात येईल.
आदेश दांडेकर, शहर अध्यक्ष, शिवसेना, मुरूड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT