Murud coconut farming Pudhari
रायगड

Murud coconut farming: रायगडात नारळाच्या झाडाला पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव

सुपारीची मोठ्या प्रमाणावर गळ सुरू; बागायतदार चिंतेत, सरकारकडून मदतीची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: कोकणाला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून अनुकूल वातावरणामुळे नारळ व सुपारी बागांची संख्या अधिक आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून बदललेले हवामान, सुपारीला कोळे रोगाचा तडाखा बसला आहे.

सुपारीची मोठ्या प्रमाणावर गळ सुरू झाली आहे. नारळाच्या झाडाव वर पांढन्या चुरशीने आक्रमण केले असून उत्पादकता कमी झाल्याने बागायतदार चिंतत आहेत. त्यामुळे सुपारी, नारळ बागायतदारांना सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी जोर धरत आाहे.

माडाची झाडांवर २० ते २५ फुटांपर्यंत औषध फवारणी करणे शक्य आहे; मात्र ८० ते ९० फुटांपर्यंत शेंड्यावर पंपाने औषध फवारणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात ४३५ हेक्टरवर नारळ (माड) आणि ४१६ हेक्टरवर सुपारीची लागवड केली जाते, मुरुड, आगरदांडा, शि नांदगाव, डिको, काशीद, सर्वे, भोईसर कापर मांडला आदी गात नारळाच्या व सुपारी बागांची संख्या अधिक आहे.

दरवर्षी येणान्या कॉम कुजव्या ,पानावरील करपा ,तंजावर ,फळगळती भुंगा ,काळ्याडोळ्याची आळी,, उंदीर, नारळाल इलिजोफाइंड कोळी आदी रोगांपासून माडाचे संरक्षण करावे लागते परंतु यंदा अतिपावसामुळे पांढन्या मारीचा तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने पानांवर बुरशी दिसून येत आहे.

नारळात अन्नरस तयार होण्याच प्रमाण कमी झाल्याने फळधारणा कमी झाली आहे. परिणामी पानांवर काळे पडले आहेत. झाडाची मागील बाजू पांढरी पडली आहे. पुरेसे पाणी न मिळाल्याने बुंध्यालग झपाटयाने सुकत आहेत.

या किडीचा प्रसार वान्यामार्फत पक्ष्यांमार्फत तसेच फळे एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी नेताना होतो. रुगोज चक्राकार पांढरी माशी ही रसशोषण करणारी कीड असून २.५ मिमी लांबाची अस्ते. झाप हलवले की पांढऱ्या माशांचे लोट हो माशीपासून रसशोषण करत असल्याने खोडावर परिणाम होती.

त्यामुळे वेळीच आयोजन जुन्या नारळ वाणाला पसंती पारंपरिक नारळ बागेत बाणवली वाण अधिक दिसते. साधारणत ८ ते १० वर्षांनी फळे येत असलेली ही माडाची जात ८० ते १०० वर्षांपर्यंत फळे देऊ शकते.

प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने नारळाच्या लागवडीसाठी शेतकन्यांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यासाठी १० गुंठ्यांपासून १० एकरांवरील सरकारने बागायतीसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. बुटक्या किंवा संकरित वाणाचा प्रचार-प्रसार होत असला, तरी दीर्घ काळ उत्पन्न देणारे जुने वाणच शेतकरी पसंत करतात.

नारळावर जुलै, ऑगस्टपासून बुरशी रोग दिसून येत आहे. झापा मागील बाजू पांढरी पडत असून, पानांच्या दर्शनी भागावर काजली पसरल्याचे आढळते. बुटक्या झाडांवर बुरशी प्रतिबंधक कार्बन बेझीन स्प्रे मारणे शक्य आहे; मात्र उंच माडांवर औषधफवारणी शक्य नसल्याने यंदा नारळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
-उदय दांडेकर, प्रगतशील शेतकरी
यंदा सुपारीला कोळे रोगाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर दुप्पट पाऊस पडल्याने बुरशीसदृश रोगाने जुलै-ऑगस्टपासून माडांची पाने माडावर काळवंडली आहेत. झापाच्या मागील बाजूला पांढरा चिक्क पसरला आहे. रोगामुळे नारळाचा आकार लहान होणार असून, उत्पादन कमी होण्याची भीती आहे. कृषी विभागाने सर्व्हे करून नुकसानग्रस्त बागायतदारांना अनुदान यावे.
-श्रीधर जंजिरकर, उपाध्यक्ष, राज्य किसान क्रांती संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT