मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
१ ऑगस्टला मुरुड परिसरातील मासेमारी शासनाची परवानगीने सुरू झाली. शुक्रवारी सकाळी विधिवत बोटीवर पूजा करून खंडोबाच्या नावाचा गजर करून सर्व कुटुंबाला निरोप घेऊन पहिल्या हंगामाची मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव आज निघाले.
सकाळी ओहोटी असल्याने मुहूर्त दुपारचा होता. तीन महिने समुद्रात मासेमारी बंद असल्याने १ ऑगस्टला सुरु होणारा हंगाम कोळी बांधवांना महत्वाचा असतो म्हणून १ ऑगस्टपासून मच्छिमार खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास सुरूवात झाली. सध्या कोळी बांधवांना मोठ्या सुरमई, मुशी जातीचे मासे मिळतील अशी आशा आहे. गेल्या वर्षी खोल समुद्रात बारा असल्याने मासेमारीची जाळी पूर्वी दिवसातून दोनदा जाळी लावण्यात येत असत. वादळामुळे एकदाच जाळी लावतात, त्यामुळे मासे कमी आणि डिझेलचा खर्च जास्त होत होता. यावर्षी देवाकडे मागणी आहे समुद्र शांत राहूदे व चांगल्या किमतीची मासळी मिळू दे. या हंगामावर पूर्ण वर्षाचे आर्थिक धोरण अवलंबून असते.
मच्छिमार बांधवांना अनेकदिवस प्रतीक्षेत असलेला डिझेल परतावा मिळविलेला नसल्याने कोळी आर्थिक संकटात आहे. कोरोनकाळात बाढलेले कर्जाची परतफेड झाली नसल्याने प्रत्येक हंगामात जाताना नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. वादळामुळे झालेले नुकसान शासन भरपाई देत नसल्याने कोळी बांधव हताश झाला होता. दोन महिने कमाई विना बैठे असलेले मच्छिमार बांधव १ ऑगस्टपासून समुद्रात होड्या लोटण्याच्या तयारीत असून होड्यांची डागडुजीसह अन्य चारीक सारीक कामे पूर्ण करण्याच्या कामी मुरुड तालुक्यांतील मच्छिमारांची लगबग झाली परंतु समुद्रात वादळी वारा आहे. ४ दिवस पाऊस सांगितल्याने कोळी बांधव चिंतेत आहेत. सर्वात महत्वाचा मासेमारीचा पहिला हंगामाला उशीर होत आहे. देवाकडे समुद्राला शांत होण्याची विनंतीसाठी मुरुड कोळीवाड्यात पूजन अर्चा करातात. जुलै महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पाऊस नसतो. परंतु यावर्षी २७ जुलै झाला तरी पाऊस वारा थांबला नव्हता.
कोळी समाज हा धार्मिक परंपरा जपणारा असून समुद्रात होड्या लोटण्यापूर्वी मल्हार मार्तंड देवाला कौल लावण्याचा प्रथात आहे. समुद्रात भरपूर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. तसेच शुभमुहूर्त काढून पूजाअर्चा करून होड्या समुद्रात सोडल्या जातात. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याला करंट असल्याने किती नौका निघतील वाचे अनुमान लावणे तुर्तास कठीण असले तरी नेमक्याच मोठ्या नौका मुहूर्त काढून मच्छिमारीसाठी जाणार आहेत.