Murud Fishing Season Pudhari
रायगड

Murud Fishing Season: मुरुडच्या खोल समुद्रातील मासेमारीला सुरवात

खंडोबाच्या नावाच्या गजरात बोटी लाटांवर स्वार होऊन निघाल्या समुद्रात; जाळी सोडताना वेळेचे बंधन

पुढारी वृत्तसेवा

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: १ आगोस्टेला मुरुड परिसरातील मासेमारी शासनाची परवानगीने असते, परंतु यावर्षी हवामान खराब असल्याने व पाऊस असल्याने १५ ऑगस्‍टपासून मासेमारीला परवानगी दिली आहे.

त्यामुळे सोमवारी सकाळी विधिवत बोटींची पूजा करून खंडोबाच्या नावाचा गजर करून सर्व कुटुंबाचा निरोप घेऊन पहिल्या हंगामाची मासेमारी करण्यासाठी कोळीबांधव आज निघाले आहेत. सकाळी ओहोटी असल्याने मुहूर्त दुपारचा होता.

मासेमारी निघताना किनारी लाटांचा मज्जा‍ तर मोठ्या लाटांना तोडून बोटी समुद्रात जाताना भयावह दिसत होते, परंतु ३ महिने समुद्रात मासेमारी बंद असल्याने १ ऑगस्टला सुरु होणारा हंगाम कोळी बांधवाना महत्वाचा असतो म्हणून १ ऑगस्टपासून मच्छीमार बांधव आपल्या बोटी घेउन खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास सुरवात झाली आहे.

सद्या कोळीबांधवाना मोठ्या सुरमई, मुशी जातीचे मासे मिळतील अशी आशा आहे. गेल्या वर्षी खोल समुद्रात वारा असल्याने मासेमारीची जाळी दिवसातून दोनदा जाळी लावण्यात येत असत. वादळामुळे एकदाच जाळी लावतात त्यामुळे मासे कमी आणि डिझेलचा खर्च जास्त होत होता. 

यावर्षी देवाकडे मागणी आहे की, समुद्र शांत राहूदे व चांगल्या किमतीची मासळी मिळू दे या हंगामावर पूर्ण वर्षाचे आर्थिक धोरण अवलंबून असते दोन महिने कमाई विना बैठे असलेले मच्छिमार बांधव 1 ऑगस्टपासुन समुद्रात होड्या लोटण्याच्या तयारीत असुन होड्यांची डागडुजीसह अन्य बारीक-सारीक कामे पूर्ण करण्याच्या कामी मुरुड तालुक्यांतील मच्छिमारांची लगबग झाली परंतु समुद्रात वादळीवारा ४ दिवस पाऊस सांगितल्याने कोळीबांधव चिंतेत आहेत.

सर्वात महत्वाचे म्‍हणजेच मासेमारीचा पहिला हंगामाला उशीर होत आहे.  देवाकडे समुद्राला शांत होण्याची विनंतीसाठी मुरुड कोळीवाड्यात पूजन अर्चा करण्यात आली. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. जुलै मोहिनीचे शेवटचा आठवड्यात पाऊस नसतो. वारा वादळ कमी होते. परंतु यावर्षी २७ जुलै आले तरी पाऊस वारा थांबत नाही म्हणून कोळीबांधव चिंतेत होते. परंतु आज वारावादळ कमी असल्याने कोळीबांधव सुखाने निघाले.

होड्या लोटण्यापूर्वी मल्हार मार्तंड देवाला कौल

कोळी समाज हा धार्मिक परंपरा जपणारा असुन समुद्रात होड्या लोटण्यापूर्वी मल्हार मार्तंड देवाला कौल लावण्याचा प्रथा आहे. समुद्रात भरपुर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. 

तसेच शुभ मुहूर्त काढुन पुजा अर्चा करून होड्या समुद्रात सोडल्या जातात. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याला करंट असल्याने किती नौका निघतील याचे अनुमान लावणे तुर्तास कठीण असले तरी नेमक्याच मोठ्या नौका मुहूर्त काढून मच्छिमारीसाठी जाणार आहेत. अशी माहिती उपलब्‍ध झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT