Pune Mumbai Railway Service Update
रायगड : मुंबई - पुणे रेल्वे मार्गांवर खंडाळा जवळ मंकीहिल येथे मालगाडीच्या बोगीची चाके निखळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्ववत सुरु होण्यास अद्याप चार तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी दिली असून ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे हाल झाले आहेत.
खंडाळा घाटात मंकी हिल जवळ पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे च्या सुरक्षा रक्षक बोगीची चाके निखळून पडल्याने पुण्याकडे जाणारी ट्रेन वाहतूक घाटात ठप्प झाली आहे. मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वे व मालगाड्या कर्जत व पळसदरी येथे थांबविण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचे काम सुरु केले असले. तरी वाहतूक पूर्ववत सुरु होण्यास अद्याप चार तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाच्या सुत्रांनी दिली आहे.
कोणत्या गाड्या खोळंबल्या?
सोलापूर वंदे भारत, जोधपूर हडपसर, कोणार्क एक्सप्रेस आणि पनवेल, नांदेड या ट्रेन रखडल्या असून काही ट्रेन्स पनवेल स्टेशनला थांबविण्यात आल्या आहेत.