खोपोली ः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचं काम पूर्ण झालं असून चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. शुक्रवारी महाराष्ट्र दिनी या मार्गिकेचं लोकार्पण होणार आहे. या मार्गिकेमुळे मुंबई-पुणे प्रवासाचं अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे.या मार्गाचे नाव मिसिंग लिंक कसे पडले याबाबतचीउत्सुकता सर्वांना लागली आहे.
25 वर्षा आधीच ठरलं होतं नाव
2001 मध्ये मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बांधकाम करताना खंडाळा घाटाचा सामवेश नव्हता. खोपोली ते भुसगाव असा मार्ग उभारण्याची योजना होती. दोन पुल आणि बोगदे बांधण्याची योजना होती. परंतु काही परिस्थितीमुळे हा मार्ग लोणावळा खंडाळा निर्मिती करण्यात आली. या मिसिंग लिंकला कालांतराने परवानगी मिळाली.
या प्रकल्पातील मिसिंग लिंक पुन्हा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. 2001 मध्ये हा प्रकल्प चुकला होता. याला मिसिंग लिंक नाव देण्यात आले होते. अखेर या मिसिंग लिंक प्रकल्पाची काम ऑगस्ट 2018 मध्ये पुन्हा सुरू झाले. डिसेंबर 2023 पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे टार्गेट होते. मात्र, कोविडनंतर आलेल्या अडचणी आणि खंडाळा घाटातील मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा यात काम करणे आव्हानात्मक होते. या मार्गाच्या कामाला विलंब झाला.
प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी कमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक खंडाळा घाट बायपास झाला आहे. 13.3 किमी लांबीच्या मार्गाची उभारणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केली आहे. आता या प्रकल्पाचे 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गाचे 1 मे रोजी लोकार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गिकिमुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी कमी होणार आहे.