मुंबई - गोवा महामार्गावर झालेला ट्रेलरचा भीषण अपघात  Pudhari Photo
रायगड

मुंबई - गोवा महामार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात : वाहन चालक जागीच ठार

Mumbai Goa Highway Accident | सुकेळी खिंडीतील खैरवाडी गावाजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

कोलाड: मुंबई -गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका संपण्याचे काही नावच घेत नाही. दररोज महामार्गावर कुठे ना कुठे तरी अपघातात घडत असतानाच महामार्गावर अपघातासाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी स्टॉपच्या समोर ट्रेलर डिवायर्डरला धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की या अपघातात ट्रेलर चालक जागीच ठार झाला.

हा अपघात सोमवारी (दि.१६) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला असून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कोलाड बाजूकडून वाकणच्या दिशेने कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर क्रं. एम.एच.४६ बी.एम. ६३३१ सुकेळी खिंडीच्या उतारावरती आला असता ट्रेलर चालकाचे आपल्या ताब्यातील गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर सरळ जाऊन डिवायर्डरला धडकला. त्यामुळे ट्रेलरवर असलेला कंटेनर १० ते १५ फुट अंतरावर उडून होऊन ट्रेलर देखिल पूर्णपणे पलटी झाला. त्यामुळे ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव (वय- ३३) हा केबिनमध्येच अडकून जागीच ठार झाला. सुदैवाने अपघात झाला त्यावेळी दुसरे कोणतेही वाहन तेथून जात नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबचे कर्मचारी तसेच ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य मनोहरभाई सुटे, किशोर नावले यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व हायड्राच्या सहाय्याने ट्रेलरचालकाला केबिनमधून बाहेर काढण्यात आले असून त्यास जिंदाल रुग्णालयाच्या रुग्णवाहीकेतून नागोठणे सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT