मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते माणगाव, इंदापूर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  Pudhari News Network
रायगड

मुंबई-गोवा महामार्ग जॅम; कोलाड - माणगावदरम्यान वाहनांच्या रांगा

पुढारी वृत्तसेवा
विश्वास निकम

कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड ते माणगाव, इंदापूर दरम्यान, २३ किलोमीटरच्या अंतरावर आज (दि.६) सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. (Mumbai-Goa Highway)

गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी आपल्या गावाला कोकणात येत असतात. आज सकाळ पासून मुंबई- गोवा महामार्गावरुन टु व्हीलर, रिक्षा, फोर व्हीलर, एसटी बस, खासगी बस, मालवाहू ट्रकची मोठया प्रमाणात वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे कोलाड, इंदापूर ते माणगाव या २३ किलोमीटरच्या अंतरावर लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामध्ये कोलाड इंदापूर, माणगाव बाजारपेठेतील रस्ता एकेरी असल्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे गावाला पोहोचण्यासाठी विलंब होत असून चार ते पाच तासांच्या प्रवासाला १२ ते १५ तास लागत आहेत. (Mumbai-Goa Highway)

दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावर प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रायगड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT