रायगड

Raigad accident | मुंबई–गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात; चालक किरकोळ जखमी

पोलिसांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली व परिस्थिती नियंत्रणात आणली

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : मुंबई–गोवा महामार्गावरील पोलादपूर नजीक चोळई हद्दीत शीतपेयाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी 2 वा 45 मिनिटांनी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरीहून मुंबईकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर (क्र. एमएच 46 सी क्यू 5186) पलटी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस स्टेशनचे सतीश पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली व परिस्थिती नियंत्रणात आणली.

या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला दिनेश दरेकर व उमेश पालकर यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT