रोहे : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी लोकल आणि स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवली जाते. यादरम्यान वर्षभरात विनाटिकीट प्रवास करणाऱ्या ८१,७०९ प्रवाशांवर रेल्वेने कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून एकूण २.७० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
या तुलनेत, गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत विनाटिकीट प्रवास करणाऱ्या ३५,८८५ प्रकरणांमधून दंड म्हणून वसूल केलेली रक्कम १.१९ कोटी रुपये होती, ज्यामध्ये या आर्थिक वर्षात सुमारे १२७% मोठी वाढ झाली आहे.