Mumbai Dam Water Supply  Pudhari News Network
रायगड

Mumbai Dam Water Supply | हेटवणेच्या जलबोगद्याने सिडको भागविणार तहान

29 किमीचा बोगदा झाला आरपार, प्रशासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प, वहाळ येथे प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

जेएनपीए (रायगड ) : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सिडको निर्माण करत असलेल्या उपनगरांना यापुढे हेटवणे धरण प्रकल्‌पातील २९ किलोमीटरच्या भूमिगत जलबोगद्याने पाणी वितरण केले जाणार आहे. या जलबो-गद्याच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील साडेपाच किलोमीटर लांबीचा पहिला जलबोगदा सोमवारी वहाळ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या उपस्थितीत आरपार झाला.

यावेळी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णमूर्ती सुब्रमण्यन, सिडकोच्या मुख्य अभियंता शिला करूणाकरण व इतर अधिकारी उपस्थित होते. सोमवारी या बोगद्याचा अंतिम सव्वा मीटरचा भाग उपस्थितांसमोर भव्य टीबीएम यंत्राने खणून हा बोगदा आरपार (ब्रेकथ्रू) खणल्यानंतर उपस्थितांनी फटाके वाजवून, हवेत फुगे सोडून आणि जोरदार संगितासह टाळ्यांच्या गजरात हा जल्लोष साजरा केला. अत्यंत कठीण भूगर्भीय का अभियांत्रिकी आव्हानांवर मात करून सिडको महामंडळाच्या इतिहासातील हा पहिला जलबोगद्याचे काम यशस्वी खणण्यामुळे २०२८ पर्यंत हा जलबोगदा पूर्ण होणार आहे.

सोमवारी बोगदा ब्रेकथ्रू या प्रकल्पातील पॅकेज-१ मधील वहाळ गावातील शाफ्ट क्रमांक ४ येथे झाला. पॅकेज-१ चे काम ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करत असून, या पॅकेजमध्ये ८.७किमी लांबीचा शुद्ध पाण्याचा बोगदा समाविष्ट आहे. आतापर्यंत ५.५२ किमी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा टप्पा गाठताना सिडकोचे अभियंते आणि ॲफकॉन्सच्या टीमने अनेक भूगर्भीय, अभियांत्रिकी व इतर आव्हानांवर मात केली. हा जलबोगदा खोदण्याचे काम जमिनीखाली सुमारे १०० मीटर खोलीवर करण्यात येत आहे.

३.२ मीटर व्यासाच्या बोगद्याचा मार्ग सह्याद्री पर्वतरांगांतील बेसॉल्ट सारख्या गुंतागुंतीच्या खडकातून जातो. मर्यादित जागेमुळे यंत्रसामग्री उभारणी हालचालींमध्ये अडचणी येत होत्या, तसेच उत्खननातून निघालेला मलबा आणि व त्याची गाडीतून वाहतूक करून बाहेर आणणे अशा प्रकारच्या बोगद्याच्या सर्वात आव्हानात्मक काम असते. सिडको अभियंते व अॅफकॉन्सच्या टीमच्या समन्वयामुळे या सर्व अडचणी यशस्वीपणे दूर करण्यात आल्याची माहिती अॅफकॉन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी दिली.

सिडकोने हेटवणे धरण जलबोगदा प्रकल्प हाती घेऊन त्याचे काम पुर्ण केले. या व्यतिरीक्त न्हावाशेवा टप्पा ३, कोंढाणे, बाळगंगा अशा धरण प्रकल्पाचे काम गतिने केले जात आहे. या वेगवेगळ्या जलप्रकल्पातून शहरांना पाणी संपन्न बनविण्यासाठी सिडकोने हे नियोजन आखले आहे. दर महिन्यातील बैठकांचे फलश्रुत म्हणजे विमानतळ आणि जलबोगदा या कामांचे यश दिसून येते.
गणेश देशमुख, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको

प्रकल्पासाठी २४०० कोटी

नवी मुंबई, उरण व पनवेल परिसरात सिडको मोठ्या प्रमाणात शहरांसह विविध प्रकल्पांतून विस्तार करत आहे. या भागांतील वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी सिडकोने पुढील २५ वर्षांची सुमारे १२७५ दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची मागणी ध्यानात घेऊन अनेक जलप्रकल्प हाती घेतले आहेत. यापैकी हेटवणे जलावर्धन प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी २४०० कोटी रूपये खर्च केला जात असून या प्रकल्पामध्ये १३.२५ किलोमीटर लांबीचा कच्च्या पाण्याचा बोगदा तसेच १५.४ किलोमीटर लांबीचा शुद्ध पाण्याचा बोगदा उभारण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिडकोची जलपुरवठा क्षमता सध्याच्या १२० दशलक्ष लिटर प्रतिदिनवरून २७० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकी वाढणार आहे.

फ्लेमिंगो टनेल बोरिंग मशीन

या प्रकल्पाला ॲफकॉन्स कंपनीने फ्लेमिंगो टनेल बोरिंग मशीन असे नाव दिले होते. एका महिन्यात ७७७ मीटर बोगदा खोदण्याचा नवा राष्ट्रीय विक्रम अॅफकॉन्स समुहाने प्रस्थापित केला असून यापूर्वी ७१४ मीटरचा विक्रम स्वता अॅफकॉन्सनेच केल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT