लालपरीचा प्रवास होणार महाग pudhari photo
रायगड

MSRTC ticket fare hike : लालपरीचा प्रवास होणार महाग

साध्या एसटींसाठी 15 एप्रिलपासून 10 टक्के हंगामी वाढ

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः एसटी महामंडळाने 10 टक्के एसटी तिकिटात दरवाढ करण्याचा निर्णयघेतला आहे. 15 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीत साधी, जलद आणि रात्रपाळीच्या सामान्य एसटी बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दहा टक्के दरवाढ केली जाणार आहे. याचा मोठा फटका नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

साध्या एसटीमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात.ही दरवाढ हंगामी आहे.ऐन सुट्टी तसेच लग्नसराईचा कालावधी असल्याने या काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी एसटीमधून प्रवास करत असतात.मागील वर्षीहीअशीच दरवाढ करण्यातआली होती.

मात्र,त्या दरवाढीला विरोधझाल्याने ती मागेहीघेण्यात आली होती. निमआराम, वातानुकूलित शयनआसनी, विना वातानुकूलित शयनआसनी, शिवशाही (वातानुकूलित), शिवनेरी (वातानुकूलित),ई शिवाइ या या बसेसना उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT