ईको-सेन्सेटिव्ह झोन केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देऊन त्यांनी संसदेच्या येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून हरकत घ्यावी. हा केंद्र सरकारचा विषय असल्याने खासदारांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेकाप नेते, माजी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. रोह्यातील शेतकर्यांनी नुकतीच शेकाप नेते जयंत पाटील यांची भेट घेतली.
रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा केंद्र सरकारच्या वतीने तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील तब्बल 437 गावे ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्रशासनाच्या मसुदामध्ये नमूद केले आहे.तर त्यात रोहा तालुक्यातील 119 गावांना वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील गावे म्हणून घोषित करत आहेत.
यात खांब परिसरातील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे,तळवली, या गावांचा समावेश आहे. या अनुषंगाने यावर हरकती घेत येथील शेतकरी ग्रामस्थांवर लादले जात असलेले वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र हे रद्द करण्यात यावा, यासाठी हे शेतकरी ग्रामस्थ विविध स्तरावर यावर हरकती घेत निवेदन देत आहेत. हा ईको झोन रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
याबाबत शेकापेच नेते,, माजी आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना देखील या शेतकरी ग्रामस्थ यांनी निवेदन दिले. यावेळी पाटील म्हणाले की, इको सिन्स्विटी झोन हे सर्वात डेंजर झोन आहे, त्याला तीव्र विरोध करण्याची गरज असल्याची सखोल माहिती उपस्थित शेतकरी ग्रामस्थांना यावेळी दिली.
केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र घोषीत करण्यासाठी 31 जुलै 2024 अन्वये जारी केलेली मसुदा अधिसुचना. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सचिव महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे पत्र 12 ऑगस्ट 2024, जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील पत्र 10 जून 2024, उप सरसंरक्षक रोहा वन विभाग रोहा यांचे कार्यालय 11 जून 2024 ची प्रारूप अधिसूचना संदर्भिय अधिसुचनेनुसार केंद्र शासनाचे पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र घोषीत करण्यासाठी 31 जुलै 2024 अन्वये मसुदा अधिसुचना जारी केला आहे. त्या अनुषंगाने 11 जून 2024 रोजी प्रारूप अधिसुचना प्रसिध्द केली आहे.
रोहे तालुक्यांतील एकूण 119 गावांना ही अधिसुचना लागु करण्यासाठी जारी केली आहे. त्यावर विरोध दर्शवित तसेच येथील बळीराजा शेतकरी यांची देखील हरकत असून हे केंद्रीय वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात यावा असे निवेदन रोहा तालुक्यातील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली येथील ग्रामस्थांच्या वतीने रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांना दिले गेले आहेत. या अनुषंगाने माजी आमदार जयंत पाटील यांना निवेदन देत याबाबतची अधिक माहिती उपस्थितांनी घेतली.
तसेच यावेळी अधिक संवाद साधताना पाटील म्हणाले की, हा केंद्र सरकारचा विषय आहे. त्यामुळे खासदार तटकरेंना निवेदन देऊन येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून हरकत घ्यावी तसेच इको सिन्स्विटी झोन हा अती डेंजर झोन आहे. वेळीच सावध रहा तसेच त्याला तीव्र विरोध करा कोणत्याही याबाबत कोणत्याही पक्षाचा हाती झेंडा व राजकारण आणू नका सर्व शेतकरी एकत्रित संघटित व्हा येत्या काळात तिसरी मुंबई आपल्याकडे येत आहे, त्यामुळे तुमच्या जमिनीला वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित हरकती बाबत अधिक तीव्र विरोध करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी अधिक शेतकर्यांच्या हिताच्या प्रश्नांवर मुद्देसूद चर्चा केली. यावेळी रोहा तालुक्यातील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली, येथील शेतकरी तथा हद्दीतील ग्रामस्थ शेतकर्यांच्या वतीने नेमण्यात आलेले शिष्ट मंडळ उपस्थित होते.
पर्यावरण संवेदनशील (इको सेन्सेटिव्ह एरिया) म्हणून जाहीर करावयाच्या अधिसूचनेचा पाचवा मसुदा केंद्र सरकारने गेल्या वर्षी जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील 900 गावे असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील 437 गावांचा समावेश आहे. याविषयी सूचना, आक्षेप नोंदवण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
इको सिन्स्विटी झोन हा केंद्र सरकारचा विषय आहे, त्यामुळे खासदार सुनील तटकरेंना निवेदन देऊन येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून त्यांनी हरकत घ्यावी तसेच इको सिन्स्विटी झोन हा अती डेंजर झोन आहे. वेळीच सावध रहा तसेच त्याला तीव्र विरोध करा. कोणत्याही पक्षाचा हाती झेंडा व राजकारण आणू नका. सर्व शेतकर्यांनी संघटित व्हावे. येत्या काळात तिसरी मुंबई आपल्याकडे येत आहे. त्यामुळे तुमच्या जमिनीला पर्यावरण संवेदनशील क्षेत्रावर हरकती घेऊन अधिक तीव्र विरोध करण्याची गरज आहे.जयंत पाटील, शेकाप नेते