Phansad Monsoon Tourism : ऐन उन्हाळ्यात पावसामुळे फणसाडचे पावसाळी पर्यटन बहरणार File Photo
रायगड

Phansad Monsoon Tourism : ऐन उन्हाळ्यात पावसामुळे फणसाडचे पावसाळी पर्यटन बहरणार

पावसाच्या सरींसह निसर्गप्रेमी घेत आहेत हिरवाईचा आनंद

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

वैशाख संपत असतानाच वरुणराजाने अचानपणे लावलेल्या जोरधारेमुळे निसर्गाला आता नवीन पालवी फुटू लागली आहे.उन्हाच्या तडाख्याने ओसाड पडलेल्या डोंगराना हळूहळू कोंब फुटू लागलेले आहे.याला फणसाडचे अभयारण्यही अपवाद कसे असू शकेल.पावसामुळे फणसाडचे अभयारण्य नवे रुप धारण करु लागलेले आहे.याचा आनंद लुटण्यासाठी निसर्गप्रेमींचा पावले आता फणसाडकडे पडू लागली आहे.उन्हासमवेतच पावसाच्या सरी अंगावर घेत,पशु,पक्ष्यांना न्याहाळत नव्या हिरवाईचा आनंद लुटण्यासाठी निसर्गप्रेमी मुरुडकडे वळतील,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईपासून 154 किमी अंतरावर अलिबाग,मुरुड मार्गावर 52 चौरस कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेल्या या अभयारण्याला जणू निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. भारतातून हजारो पर्यटक फणसाडला भेट देतात . खासकरून पावसाळी अतिशय सुंदर वातावरण असते .घनदाट झाडी असल्याने पावसाचे प्रमाण खूप आह,फणसाड हे उंचावर असल्याने पावसात धुक्यासारखे वातावरण असते ,शेकडो पाणवठे पावसाच्या पाण्यानी भरून जातात ,प्राणी जलक्रीडा करण्यासाठी पाणवट्यावर येतात .फणसाड धारण फुल्ल भरून त्याच्या वाहून जाणार्‍या पाण्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक बोर्लीमांडला मार्गे भोईघर गावात येतात .गावातून?धरण हे 10 मिनिटावर असल्याने गावाला पर्यटन व्यवसाय मिळतो ,फणसाड धबधब्याला हिरवागार भात शेतातून जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो .पण अजून धबधबा सुरु होण्यास वेळ आहे ,जूनच्या 15 तारखे पर्यंत सुरु होणार असे अधिकारी सांगत आहेत.मात्र नुकत्याच पडलेल्या पावसाने काही ठिकाणचे धबधबे आता थोड्याप्रमाणात प्रवाहित झाल्याचे जाणवत आहेत.

या वैविध्यपूर्ण जंगलात सुमारे 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात. पश्चिम घाटांतर्गत येणार्‍या या भूप्रदेशाचे उष्णकटीबंधीय हवामान असून तापमान किमान 25 ते कमाल 35 अंश सेल्सीयस इतके असते. सरासरी 2800 मिलीमीटर पावसाची नोंद येथे घेण्यात आली आहे. ’फणसाड अभयारण्यात साग व निलगिरीची रोपवने यासह प्रामुख्याने एैन, किंजळ, जांभूळ, द्वेद, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक नरक्या याबरोबरच सीताअशोक, सर्पगंधा, कुरडु, रानतुळस, कढीपत्ता उक्षी या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेली व जगातील सर्वात लांब वेलींपैकी एक असलेली गारंबीही नजरेस पडते.

फणसाड वन्यजीव अभयारण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले ’शेकरू’ येथे हमखास दृष्टीस पडते.

स्थानिकरित्या आढळणारे जांभा दगडातील नवाबाने खास शिकारीसाठी बांधले आडोसे जागोजागी आजही पहावयास मिळतात. येथील पर्यटकाच्या सुविधेसाठी आखण्यात आलेल्या आहेत . ठराविक प्राणी-पक्षी या ठिकाणी हमखास दर्शन देतात.पर्यटकांना वनभोजनाचा आनंद गावातील महिला बचत गट स्वस्त व चविष्ट भजन देतात ,तर या यंदाच्या पाऊसात फणसाड अभयारण्य भेट द्या

भटकंतीसाठी विशेष वाटा

अभयारण्यात भटकंतीसाठी विशेष वाटा (ट्रेल) तयार केल्या आहेत. त्यात फणसाडगाण, धरणाधीमान, चिखलगाण, सावर तलाव सुपेगाव देवराई याचा समावेश आहे. गाण म्हणजे पाण्याची जागा. फणसाड वन्यजीव अभयारण्यात तम्बल 27 पाणस्थळे आहेत. यातील चिखलगाया पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात. त्यांचे जवळून निरीक्षण करता यावे येथे खास एक गृह बांधण्यात आले आहे तसेच पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणासाठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. यातून दिसणारे दृष्य मन मोहून टाकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT