खोपोली : खंडाळा घाटातील मंकी हिल रेल्वे ट्रँकवर पेट्रोलिंग करणार्या परप्रांतीय कामगारांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने दोघांनी हाताबुक्यांनी लाकडाचे दांडक्याने डोक्यात फटके मारल्याने रमेशचंद्र वर्मा (वय - 33,रा.उत्तर प्रदेश ) या तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवार दि.17 आँगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली असून दोघेही आरोपी फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खोपोली गावचे हद्दितील मंकी हिल येथे रेल्वे ट्रँकवर पेट्रोलिंग करणारे कामगार राहत आहेत. कॅबेन स्टेयान जवळील ओल्ड पावर हाऊस या इमारतीचे मजल्यावरील मोकळ्या दोन कामगार (दोघेही राहणार उत्तर प्रदेश ) आणि मयत रमेशचंद्र वर्मा यांच्यात शाब्दिक वाद झाले.
यावेळी 25 वर्षीय दोघे आरोपींनी रमेशचंद्र वर्मा याला हाताबुक्यांनी लाकडाचे दांडक्याने डोक्यात फटके मारले. यावेळी तो जमिनीवर कोसळला. यावेळी दोघेही आरोपी फरार झाले. जखमी रमेशचंद्र तेथून कर्जत येथील रूग्णालयात हालविण्यात होते.परंतु गंभीर जखमी असल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहे.