Poladpur Nagar Panchayat Protest
पोलादपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर यांनी आज महाराष्ट्र दिनी पोलादपूर नगरपंचायतीच्या भ्रष्ट व बेकायदेशीर कारभाराविरोधात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मागील काही वर्षांत पोलादपूर शहर आणि नगरपंचायती संदर्भातील विविध प्रश्नी उपोषणाद्वारे आंदोलन करून जनतेसह प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बांधलेल्या मंडपामध्ये आज (दि. 1) सकाळी साडेअकरा वाजता जनहितासाठी वारंवार दिलेल्या निवेदनांकडे पोलादपूर नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेविरोधात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची न होणारी अंमलबजावणी यामुळे दरेकर व ओंकार मोहरे यांनी शिक्षण विभागाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे.
दर्पण दरेकर म्हणाले की, पोलादपूर नगर पंचायतीकडून प्रशासकीय कामाच्या पद्धतीमुळे जनतेची अवहेलना होते. जनतेचे भेडसावणारे प्रश्न विविध समस्या आम्ही वेळोवेळी मांडले आहेत. मात्र, येथे विकास कामे झाली त्यामध्ये अनियमितता व दप्तर दिरंगाई होत असून अनेक प्रकरणे समोर आणली. परंतु त्यांच्याकडून ठोस उपाय योजना व सकारात्मक उत्तरे मिळत नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
ओंकार मोहिरे म्हणाले की, पोलादपूर पंचायत समिती शिक्षण विभागाकडून आमच्या मागण्यांना दाद मिळत नाही. वेळोवेळी निवेदनाद्वारे अनेक प्रश्न व समस्या बाबत रोखठोक चर्चा व आंदोलने केली. मात्र, शिक्षण विभागाकडून अपेक्षित उत्तरे मिळत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्न आणि समस्यांबाबत उत्तरे देण्याबाबत सांगून देखील पंचायत समिती शिक्षण व कडून सकारात्मक उत्तरे मिळत नाही.