Girl Molestation file photo
रायगड

Mhasla Crime News: म्हसळ्यात पाचजणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सर्व आरोपी अटक, दोन अल्पवयीन

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा शहर: म्हसळा तालुक्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ओळखीतील व्यक्तींसह घराच्या बांधकामाचे काम करणाऱ्या मिस्त्रीने वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या ओळखीतील काही व्यक्तींनी तिला धमकावून तसेच फसवून वेळोवेळी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे म्हटले आहे. अत्याचार करणारी संबंधित व्यक्ती वाशी हवेली, ता. तळा येथील रहिवासी आहे.

या प्रकरणात घराचे बांधकाम करणाऱ्या मिस्रीनेही या पीडित मुलीवर अत्याचार केले. एप्रिल २०२६ ते जून २०२६ या कालावधीत पीडितेच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत, जबरदस्तीने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(ड), तसेच तक्रारीत नमूद केल्यानुसार भादंवि कलम ३७६(२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम मधील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसळा पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT