Matheran Water Shortage Pudhari
रायगड

Matheran Water Shortage: माथेरानमध्ये पाणी कपात सुरू; पर्यटन हंगामाआधी जल प्राधिकरण सतर्क

दर सोमवारी-मंगळवारी पुरवठा बंद; मे महिन्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजन

पुढारी वृत्तसेवा

माथेरान : मिलिंद कदम

माथेरानकरांना आता उन्हाळी पर्यटन हंगामाचे वेध लागले असून लवकरच परीक्षा संपून माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. या हंगामामध्ये माथेरानकरांना पाणी टंचाई सामोरे जाऊन लागू नये म्हणून जल प्राधिकरणाने आतापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व मंगळवारी विविध विभागातील पाणी कपात सुरू केले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी माथेरानकरांना पाणीटंचाई सामोरे जावे लागणार नाही असे प्राधिकरणाने नियोजन केले आहे.

माथेरानमध्ये मागील काही दिवसांपासून गरमीने डोकेवर काढले असताना माथेरानला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या तलावात असणारे पाणी माथेरान पर्यटन नगरीला पिण्याकरता पुरवठा केला जातो व हे पाणी कमी पडत असल्याने नेरळ येथून पंपिंग द्वारे माथेरानला जादाचा पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यामुळेच या पर्यटन हंगामामध्ये माथेरानकराना पाणीटंचाईस सामोरे तर जावे लागणार नाही ना याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे. परंतु जल प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सुनियोजित नियोजनामुळे पाणीटंचाई सध्या तरी जाणवत नसल्याने सर्वत्र समाधान होत आहे.

काही वर्षांपूर्वी माथेरानमध्ये या तलावातून पूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे व ऐन पर्यटन हंगामामध्ये येथे भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागत होते परंतु नेरळ येथून माथेरान करतात जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर माथेरानकरांची पाणी टंचाईपासून मुक्तता झाली होती परंतु मे महिन्याच्या शेवट शेवटला मात्र पाणीटंचाई भासू लागते परंतु यावर्षी नेरळ येथून होणारा पाणीपुरवठा समाधानकारक असल्याने व शार्लेट लेकमध्ये मुबलक पाणीसाठा सध्या उपलब्ध असल्याने माथेरानकरांना अजून तरी पाणी टंचाईस सामोरे जावे लागलेले नाही. परंतु जल प्राधिकरणाने नेरळ येथून होणाऱ्या पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पंपांची दुरुस्ती योग्य प्रकारे करून ठेवल्यास मे महिन्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाईपासून माथेरानकरांना दिलासा निश्चित मिळणार आहे.

माथेरानमध्ये मे महिन्यामध्ये पूर्वी होणारी पर्यटकांची गर्दी मागील काही वर्षांमध्ये कमी झाल्याने पाण्याचा वापरही कमी झाला आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये माथेरान करांना पाणीटंचाई जाणवत नाही परंतु काही भागांमध्ये मात्र पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असतात जल प्राधिकरणाने दोन महिने आधीपासूनच प्रत्येक सोमवार व मंगळवार या दोन दिवशी विविध भागात पाणी पुरवठा बंद केला असल्याने सध्या माथेरान मधील तलावात पाणी उपलब्ध आहे.

दोन दिवस विविध भागांत पाणीपुरवठा बंद

काही भागांमध्ये मात्र पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असतात. जल प्राधिकरणाने दोन महिने आधीपासूनच प्रत्येक सोमवार व मंगळवार या दोन दिवशी विविध भागात पाणी पुरवठा बंद केला असल्याने सध्या माथेरानमधील तलावात पाणी उपलब्ध आहे, त्यामुळेच येणाऱ्या पर्यटन हंगामात माथेरानकरांना पर्यटन हंगाम असाच राहिला तर पाणी टंचाई सामोरे जावे लागणार नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT