Rural Roads Pudahri
रायगड

Rural Roads: जन्मापासूनच नवजात बालकाचा खडतर प्रवास

उंबरणेवाडीची मनीषा पारधी तान्हुल्यासह त्याच डोलीतून माघारी

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत गोपाळे

खोपोली: आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात खडतर प्रवास करावा लागतोच,पण तो कधी सुरू होतो हे नियतीलाच माहिती. मात्र माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या उंबरणेवाडीतील आदिवासींचा खडतर प्रवास जन्मापासूनच सुरू आहे. असाच प्रवास मनिषा पारधी आणि तिच्या तान्हुल्याच्या वाट्याला आलाय.

नुकतीच बाळाला जन्म दिलेली मनिषा पारधी आपल्या नवजात बाळासह उपचारानंतर पुन्हा गावाकडे परतली; मात्र गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तिला आणि बाळाला कापडाच्या झोळीतून सात ते आठ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागला. यावरून नवजात बालकाच्या पदरीही पायपीठ आली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटून गेली, तरी या भागात पक्का रस्ता, वीज आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा किंवा दैनंदिन गरजांसाठी ग्रामस्थांना अनेक किलोमीटर पायी चालत जावे लागते. "रस्ता केव्हा होणार

निसरड्या वाटेने सुरक्षित डोलीतून घरी

पावसाळ्यामुळे डोंगरदऱ्यांतील पायवाट अत्यंत निसरडी झाली असून, ठिकठिकाणी छोटे नाले व ओढे ओलांडत सुमारे दोन ते अडीच तासांचा हा खडतर प्रवास करावा लागला. पाय घसरून अपघात होण्याची भीती असतानाही ग्रामस्थांनी अत्यंत सावधगिरीने मनिषा पारधी व तिच्या बाळाला सुरक्षितपणे घरी पोहोचवले.या घटनेमुळे ऊंबरणेवाडीतील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT