माथेरान : मिलिंद कदम
माथेरान मध्ये नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच बदलाचा वेगळा अनुभव घेता आला,यावेळी निवडणुकीमुळे भावभावकित चुरस पहावयास मिळाली त्यामुळे नात्यामध्ये दुरावा ही अनुभवास मिळाला.
तब्बल नऊ वर्षानंतर माथेरान मध्ये निवडणूक होत असल्यामुळे नव मतदारांमध्ये उत्साह होता व याच मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्याकरता राजकीय पक्षांमध्ये चुरस पहावयास मिळाली. येणाऱ्या पिढीला या निवडणुकीमध्ये अनेक चांगले व वाईट अनुभव अनुभवास मिळाले कारण फक्त 4055 मतदार संख्या असलेल्या माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार पहावयास मिळाला.
या नव मतदारांना जुन्या पिढीकडून आपण काय देतोय याचाही विचार या निवडणुकीमध्ये कुठेही पहावयास मिळाला नाही. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिला जात असलेल्या निवडणुकांना यामुळे गालबोट लागले आहे हे नक्की.
अनेक प्रभागांमध्ये भावकितील उमेदवार असल्याने परिवारामध्येच मोठी घुसमट पहावयास मिळाली ज्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याकरिता रस्सीखेच झाल्याने दुरावाही पहावयास मिळाला. माथेरानकरांना केव्हाच अभिप्रेत नव्हती परंतु या निवडणुकीमुळे अनेक दुरावे मात्र नक्कीच निर्माण झाले आहेत.
या काळात वाढला होता ज्यामुळे अनेक जण उघड नाराजी बोलून दाखवत होते यापूर्वी ही असा हस्तशेप असायचा पण यावेळी घरोघरी बाहेरील लोक जात होते त्याचा हि येथील शांत नागरिकांना अनुभव घेता आला त्यामुळेच ही निवडणूक धडा शिकवून गेली असून या पुढील घोडेबाजाराच्या जीवावरच जिंकता येणार असे चित्र आहे.