माथेरान ः मिलिंद कदम
बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी अमावास्येच्या दिवशी माथेरान स्मशानभूमीत अघोरी पूजा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सकाळी नगरपालिका कर्मचारी विजय चव्हाण, वसंत दवे हे एका अंतिम संस्काराची तयारी करण्यासाठी स्मशानभूमीत आले असता त्यांनी हा प्रकार पाहिला.
माथेरानमध्ये नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशा प्रकारचे आघोरी कृत्य स्मशानभूमीमध्ये घडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या पाठीमागे नेमके कोण आहे. याविषयी चर्चांना ऊत आले आहे. काहीजण तर या आघोरी प्रकारचा निवडणुकीशी थेट संबंध जोडत आहेत. निवडणूक जिंकण्या करता अशा प्रकारचा अघोरी प्रकार माथेरानकर पहिल्यांदाच अनुभव आहेत.
घटनास्थळी लाल भोपळे, सुरी, त्यावर ठोकलेल्या मोठाले खिळे अगरबत्त्या, दोन मोठी मडकी, छोट्या बकऱ्याची मुंडी, मासाचे तुकडे तसेच रक्त सांडलेले दिसून आले. स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या दोन खड्ड्यांमध्येही काहीतरी विधी करून गाडून ठेवलेले असल्याचे विजय चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान माथेरानमध्ये निवडणूक काळ सुरू असल्याने हा प्रकार काळी जादू करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. या वेळी हा विधीचे सर्व पूजा केलेले साहित्य ठिकाण वसंत दवे यांच्या अंतिम संस्काराला गेलेल्या सर्व नागरिकांनी पाहिल्याने अनेक उलट सुलट चर्चाना माथेरानमध्ये उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत अधिक माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.