माथेरानच्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेस प्रशासन असमर्थ pudhari photo
रायगड

Matheran accessibility challenges : माथेरानच्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेस प्रशासन असमर्थ

घाटरस्त्यात सुट्ट्यांच्या हंगामात वाहनांची प्रचंड गर्दी; दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या अगणित

पुढारी वृत्तसेवा
माथेरान : मिलिंद कदम

जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान मध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या अगणित वाढते आहे. त्यातच याठिकाणी वाहनांच्या पार्किंगची संख्या जागेअभावी मर्यादित असल्याने नेरळ माथेरान या घाटरस्त्यात सुट्ट्यांच्या हंगामात वाहनांची प्रचंड गर्दी होत असून वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

याबाबत सर्व माहिती शासन आणि प्रशासनाला ज्ञात असताना देखील इथे अद्याप पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने नागरिक आणि पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर्षी जून महिन्यापासून दर शनिवार रविवारी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने या दिवसात घाटातच आपल्या किंमती गाड्या पार्क करून त्यांना आपल्या लवाजम्यासह माथेरान गाठावे लागत आहे. अशी परिस्थिती अजून कुठपर्यंत सुरूच राहणार आहे.

दोन दिवस आरामासाठी आणि इथले नैसर्गिक सौंदर्य न्याहाळण्यासाठी येणार्‍याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पर्यटक येत आहेत म्हणून इथे सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यांनाच जर का सुविधा निर्माण केल्या नाहीत तर ह्या स्थळाला आगामी काळात धोक्याची घंटा नाकारता येत नाही असे जेष्ठ मंडळी बोलत आहेत.

राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे हे स्थळ अद्यापही विकसनशील होऊ शकलेले नाही. केवळ मतांच्या राजकारणापायी इकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निदान पर्यटनमंत्र्यांनी तरी याठिकाणी एखादवेळ लक्ष केंद्रित करून पर्यटनास चालना द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

माथेरान रोपे प्रा. लि. कंपनीला रोपे वे साठी सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा 2016 मध्येच परवानगी दिलीआहे. आता त्याला जवळ जवळ नऊ वर्ष झाली. त्यांना आतापर्यंत निधी उभा करता आला नाही. जर ते हा प्रकल्प करण्यास असमर्थ असतील तर शासनाने हा प्रकल्प ताब्यात घ्यावा. पर्यटकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. परंतु आज जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अपुरे आहे. प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाने लक्ष घातलं पाहिजे. परंतु या कंपनीच्या प्रवर्तकांच्या दबावापुढे शासकीय अधिकारी काहीच करत नाहीत. ते रोपवे करत नाहीत आणि एमएमआरडीएच्या फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाला आक्षेप घेतात.या प्रवर्तकांकडून (कर्जत) भुतीवली मार्गे माथेरान रोप वे प्रकल्प शासनाने एमटीडीसी अथवा एमएमआरडीए च्या माध्यमातून पुर्ण करावा. आणि माथेरानकरांचे व पर्यटकांचे हाल संपवावेत.
मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT