Marathi Diwali Ank History pudhari photo
रायगड

Marathi Diwali Ank History : मराठी दिवाळी अंक संस्कृती

मराठी वाचकांचा मनोरंजन च्या पहिल्या दिवाळी अंकाला प्रचंड तिसाद मिळाला आणि यामुळे प्रोत्साहित होऊन दरवर्षी मराठीमध्ये अनेक दिवाळी अंक निघू लागले.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश केळुसकर

मराठी साहित्यात दिवाळी अंकांची परंपरा आणि संस्कृती ११७ वर्षांपूर्वी सुरू झाली. याची सुरुवात १९०९ मध्ये पुण्यात का. र. मित्र संपादित 'मासिक मनोरंजन' या अंकाने केली, नो भारतीय स्तरावरील पहिला दिवाळी अंक होता. या पहिल्या दिवाळी अंकात तत्कालीन साहित्य, समाजकारण आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी लेखन केलं होतं. का. र. मित्र यांनी या अंकासाठी नामवंत साहित्यिक आणि विद्वानांची निवड केली होती. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचं विचारप्रवर्तक लेखन या अंकात समाविष्ट होतं.

थोर प्राच्यविद्यापंडित आणि समाजसुधारक डॉ. रा. गो. भांडारकर यांनी या अंकासाठी विशेष नेखन केलं होतं. बालकवींच्या कविता या हिल्या दिवाळी अंकाचं मोठंच आकर्षण होत्या. कवयित्री आणि लेखिका लक्ष्मीबाई टिळक यांचं नाहित्य यात प्रसिद्ध झालं होतं. बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई गायकवाड यांचंही लेखन अंकात समाविष्ट होतं. मराठी वाचकांचा मनोरंजन च्या पहिल्या दिवाळी अंकाला प्रचंड तिसाद मिळाला आणि यामुळे प्रोत्साहित होऊन दरवर्षी मराठीमध्ये अनेक दिवाळी अंक निघू लागले.

दिवाळीचा फराळ जसा जिभेचे चोचले बरवतो, तसाच दिवाळी अंक हा मराठी बाचकांच्या बौद्धिक आणि वाङ्गयीन भुकेला तृप्त करणारा 'वाचन फराळ मानला जातो. सद्या दरवर्षी महाराष्ट्रात साधारण ३०० ते ५०० च्या रम्यान विविध विषयांवर (ललित साहित्य, बर्यटन, आरोग्य, पाककला, गृह सजावट, विनोद, रहस्य, ज्योतिष इ.) दिवाळी अंक प्रकाशित होतात. हा केवळ व्यापाऱ्यांचा किंवा काशनाचा विषय नसून, मराठी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

दिवाळीचा फराळ जसा जिभेचे चोचले पुरवतो, तसाच दिवाळी अंक हा मराठी वाचकांच्या बौद्धिक आणि वाङ्मयीन भुकेला तृप्त करणारा 'वाचन फराळ' मानला जातो. सद्या दरवर्षी महाराष्ट्रात साधारण ३०० ते ५०० च्या दरम्यान विविध विषयांवर दिवाळी अंक प्रकाशित होतात. हा केवळ व्यापाऱ्यांचा किंवा प्रकाशनाचा विषय नसून, मराठी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

यंदाच्या दिवाळी अंकांनीही ही वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेली आहे. यंदाच्या सचिन परब संपादित दै. पुढारीच्या मुख्य 'दीपस्तंभ' या दिवाळी अंकातील परिमल माया सुधाकर यांचा' अ सायको अनॅलिसिस ऑफ द प्रेसिडेंट-डोनाल्ड ट्रम्प असं का वागतात ?' हा लेख डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील पराभवामागच्या कारणांवर प्रकाश टाकणारा आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित 'ईठा' हा सिनेमा लवकरच रिलीज होईल. पण त्याआधी विठाबाईंबद्दल जाणून घ्यायचं असेल तर 'पुढारी दीपस्तंभ' मधला नेहा सराफ कंकरेज यांचा 'विठासारखी विठाच' हा रिपोर्ताज वाचला पाहिजे.

दै. पुढारीच्या ठाणे-रायगड-पालघर आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध झालेला आणि 'कोकणातील सण-उत्सव परंपरेची अस्मिता' ही टॅगलाईन असलेला कोकण विभागीय दिवाळी अंकही लक्षवेधी झाला आहे. यामध्ये प्रस्तुत लेखकाने लिहिलेला 'कोकणातील सण उत्सव' आणि प्रियानी पाटील यांचा' कोकणातील मत्स्यसंपदा' हे लेख वाचकांची जिज्ञासापूर्ती करतील. तसंच पूर्वा पंडित आणि डॉ. महेशकुमार मिश्रा यांनी बदलत्या परिभाषेतून दशावतार परंपरेचा घेतलेला शोध लोककला अभ्यासकांचं लक्ष वेधून घेईल.

कोकणचं अर्थकारण, कोकणची लोकसंस्कृती, इथला निसर्ग, सह्याद्रीमधील जैवविविधता आणि कोकणच्या माणसाचं पश्चिम घाटाशी असलेलं नातं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न पुढारीच्या या कोकण विभागीय दिवाळी अंकात करण्यात आला आहे. अक्षय संभाजी आंब्रे यांचं सुलेखन आणि कला संपादनामुळे अंक देखणा झाला आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाचा कै. वि. पु. भागवत पुरस्कार ज्यांना नुकताच जाहीर करण्यात आला. त्या 'अनघा प्रकाशना'चा विद्या मुरलीधर नाले संपादित, ४८ वा 'अनघा' दिवाळी अंक राजकारण, कथा, कविता, ललित लेख, वैचारिक लेख अशा समृद्ध साहित्यानं नटलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या मुलाखतीत त्यांनी देशाच्या आजच्या अधोगतीला मुख्यतः सुशिक्षित सवर्ण मध्यमवर्ग जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीबद्दल प्रा. नरेंद्र पाठक यांचा '१०० वर्षे समर्पणाची' हा लेख, आरएसएसच्या राष्ट्र जागरणाचा शंभर वर्षांचा प्रवास अधोरेखित करतो. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त कॉम्रेड राजू देसले यांनी ' त्याग संघर्ष बलिदानाची १०० वर्षे' या आपल्या लेखात कम्युनिस्टांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्यांचा आदर, धर्मनिरपेक्षता, पर्यावरण संरक्षण आणि श्रमिकांच्या हक्कांवर आधारित भारत घडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अभिराम अंतरकर संपादित यंदाच्या 'हंस 'दिवाळी अंकातील विविध धाटणीच्या तब्बल २२ कथा आणि प्रशांत असनारे, मेगमेहेन, नारायण लाळे, हेमंत गोविंद जोगळेकर, अनुजा जोशी, प्रतिभा सराफ, मंदाकिनी पाटील, आदित्य दवणे आदी कवींच्या कविता वाचकांना पुरेपूर वाचनानंद देतील.

ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले आणि नाटककार अभिराम भडकमकर या नामवंतांनी 'अक्षरधारा'च्या दिवाळी अंकात पुस्तकांविषयी खास लेख लिहिलेत. त्याशिवाय प्रकाशन क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या रामदास भटकळ यांची कवी दासू वैद्य यांनी घेतलेली मुलाखत, भटकळांचं विविध रंगी व्यक्तिमत्व उलगडून दाखवते.

स्नेहा अवसरीकर यांनी या अंकाचं संपादन केलं आहे. विश्वास कणेकर संपादित 'आर्याबाग' दिवाळी अंकामधील 'भाषा आणि आपण' हा विशेष विभाग डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. दीपक पवार, विश्राम ढोले, श्रीधर लोणी, गजू तायडे, रवींद्र दामोदर लाखे आदींच्या लेखनामुळे संग्राह्य झाला आहे.

आर्याबागवाल्यांनी अशोक नायगावकर यांची बाराखडीची कविता पुनर्मुद्रित केली आहे. पण अरुण शेवते संपादित 'ऋतुरंग'ने छापलेला नायगावकरांचा नदीच्या किनारी हा ताजा लेख वाईची कृष्णा नदी जिवंत करतो. 'दीपावली 'च्या दिवाळी अंकाचे यंदा ८२ वे वर्ष आहे. अशोक केशव कोठावळे यांच्या संपादनाखाली मिळालेला हा अंक डॉ. बाळ कोंडके यांच्या जेन झी पिढीवरील 'आमच्या पिढीची गोष्ट वेगळीं' या लेखामुळे तसंच 'भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाला ओहोटी लागली आहे का? 'या लेखमालेमुळे बहुचर्चित होईल असा अंदाज आहे. गेल्या तेरा वर्षांपासून 'अक्षरवेध' या दिवाळी अंकाचं संपादन राजन लाखे करत असतात.

यंदाचा अंक कविवर्य नारायण सुर्वे विशेषांक असून सुर्वे मास्तरांच्या विविध गाजलेल्या कवितांची रसग्रहणे डॉ. माधवी वैद्य, अरुण म्हात्रे, अंजली कुलकर्णी, किरण येले, रमजान मुल्ला आदी आघाडीच्या अभ्यासकांनी आणि कवींनी केली आहेत आणि दर्जेदार साहित्याचा मानदंड समजला जाणारा, मोनिका गजेंद्रगडकर संपादित, यंदाचा मौज दिवाळी अंक श्रीकांत बोजेवार, नीरजा यांच्यासारख्या नामवंतांच्या कथा, नंदू मुलमुले, सुबोध जावडेकर, मिलिंद बोकील आदी नामवंतांचे लेख आणि समकालीनांच्या प्रगल्भ कवितांनी नेहमीप्रमाणे अभिजात समृद्ध वाचनानुभव देणारा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT