ऐतिहासिक जलदुर्गांना मिळणार पर्यटनाचा नवा आयाम pudhari photo
रायगड

Sea forts tourism : ऐतिहासिक जलदुर्गांना मिळणार पर्यटनाचा नवा आयाम

शिवकालीन आरमार ते आधुनिक जलमार्ग! सागरी किल्ल्यांना लाभणार 'मॅजिक कनेक्टि्व्हिटी'

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

गाेव्या बराेबरच पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळवणार्या काेकण किनारपट्टीच्या ऐतिहासिक जलदुर्गांना पर्यटन कनेक्टीव्हीटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पर्यचनाचे नविन सागरी सर्किट किल्ले कुलाबा ते किल्ले विजयदुर्ग असा हा जलप्रवास सुरु हाेणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा राज्याच्या साम्राज्यात सागरी आरमार हे कुलाबा ते विजयदुर्ग या ७२० किमीच्या किनारपट्टीवर उभे राहीले हाेत. या ऐतचिहासिक जलदुर्गांना पर्यटनाची नवी झळाळी मिळणार आहे. कुलाबा येथे सरखेल कान्हाेजीराजे आंग्रे आणि विजयदुर्ग येथे असलेले आनंदराव धुळप या मराठा राज्याच्या शिलेदारांनी या किल्ल्याना आपल्या कर्तृत्वातून नवी ओळख दिली हाेती. तेच किल्ले आता हेरिटेज पर्यटनाचे नवे दुत ठरणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखली जात आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे ७२० किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावरील ऐतिहासिक जलदुर्गांना 'जलदूत' वा 'सागरमाला' आणि सागरी पर्यटन (क्रुझ अॅन्ड वाॅटरवेज टूरिझम) या संकल्पनांतर्गत समुद्रमार्गाने जोडण्याचे धोरणात्मक नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा आरमाराच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या जलदुर्गांच्या विकासाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. परिणामी सागरीकिल्ल्यांना आगळी 'मॅजिक कनेटिक्व्हिटी' लाभणार असून काेकण किनारपट्टीतील येत्या काळात नवा पर्यटन आयाम प्राप्त हाेणार आहे.

रायगडमधील चार,सिंधुदुर्ग व पालघरमधील प्रत्येकी दाेन, रत्नागिरीतील एका किल्ल्याचा समावेश ज्याची समुद्रावर सत्ता ताेच किनारपट्टीचा राजा अशी छत्रपती शिवाजी महारांजांची सागरी किल्ले उभारणी मागची युद्धनिती हाेती. आणि त्यातूनच सागरी किल्ल्यांची उभारणी केली तेच किल्ले आज तत्कालीन इतिहासाची साक्ष देत आहेत.

त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला मराठा आरमाराचा मुख्य तळ राहीलाल सिंधुदुर्ग(मालवण) किल्ला, 'पूर्वेकडील जिब्राल्टर' म्हणून प्रसिद्ध असलेला आणि अद्ययावत युद्धनौका गोदी असलेला भक्कम किल्ला विजयदुर्ग किल्ला, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या आरमाराचे मुख्य केंद्र राहीलेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापाेली-हर्णे येथील सुवर्णदुर्ग, सिद्दीच्या जंजिऱ्याला शह देण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग उभारला होता, तर जंजिरा हा अजेय जलदुर्ग म्हणून ओळखला जातो.

मुंबईच्या समुद्रात ब्रिटिश सत्तेवर वचक ठेवण्यासाठी उभारलेले अलिबाग जवळील खांदेरी-उंदेरी किल्ले आणि पोर्तुगीज आणि मराठा कालखंडातील ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असणारे पालघर जिल्ह्यातील वसई आणि अर्नाळा किल्ले यांचा समावेश पहिल्या टप्प्यात राहाणार आहे.

सर्व सागरी किल्ले समुद्रमार्गाने जोडणे हा सध्या सरकारच्या धोरणात्मक नियोजनाचा एक मुख्य भाग असून वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून या दिशेने टप्प्याटप्प्याने काम सुरू आहेत हे आनंददायी आहे. या योजनेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची आणि मराठा साम्राज्याच्या सागरी वैभवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख निर्माण हाेईल.इथे येणाऱ्या इतिहास प्रेमींना या किल्ल्यांचा इतिहास माहित व्हावा यासाठी अधिकृत गाईड येथे उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्याच बराेबर या एेतिहासिक पर्यटनात त्या ऐतिहासिक किल्ले ,वास्तू यांचे पावित्र्य आपण राखले पाहीजे.
याेगेंद्र उर्फ राज मेमाणे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व लेखक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT