दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव file photo
रायगड

Durgotsav Diwali 2025 : दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव

छत्रपतींना शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

पुढारी वृत्तसेवा

रायगड : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सन्मान अवघ्या भारत देशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बाळकं मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करतात. याच दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनिनी अर्थात ‌’अमृत‌’ ने दुर्गोत्सवाचे या दीपावलीमध्ये आयोजन केले असून प्रत्येक नागरिकाने गड दुर्ग बनवून सेल्फीसह अपलोड करून छत्रपतींना अनोखी मानवंदना द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

छत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या 12 दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून आला. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरोघरी बाल मंडळी, तरुण, ज्येष्ठ नागरिक दुर्गांच्या प्रतिकृती साकारतात.

नागरिकांनी आपल्या अंगणात, बाल्कनीत, हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागां मध्ये या 12 दुर्गांपैकी कोणतीही एक हुबेहूब प्रतिकृती बनवावी आणि आपल्या संकेतस्थळावर त्या सोबतचा सेल्फी पाठवावा. दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांच्या छायाचित्रांचे संकलन केले जाईल. सहभागी झालेल्या सर्वांना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने ‌’अभिनंदन पत्र‌’ पाठवण्यात येईल. तसेच अमृतने जनमाध्यमांद्वारे तयार केलेल्या अमृत विद्यया या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मवर छत्रपतींच्या गौरवशाली इतिहासावर आधारित 999/- रुपयांचे प्रशिक्षण निःशुल्क उपलब्ध करून दिले जाईल. यात स्वराज्य रक्षकदुर्ग, शिवरायांच्या आयुष्यातील घटना, कविभूषण यांच्या कविता, स्वराज्यासाठी लढलेल्या योद्ध्यांचा परिचय यांचा समावेश असेल. हा एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प अमृतने केला आहे.

दुर्गोत्सव 2025 या कार्यक्रमाचे अनावरण ‌’शिवसृष्टी हिस्टोरिकलथीम पार्क‌’, पुणे येथे अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्याहस्ते पार पडले. या कार्यक्रमात अमृतचे वरिष्ठ अधिकारी श्रीराम बेंडे, प्रवीण पांडे, सदेहश्वर वरंगावकर आणि राज्य व्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते.

बारा किल्ल्यांची प्रतिकृती तयार करा

रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड, साळेरदुर्ग, खान्देरीचादुर्ग, जंजिरी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग (सुवर्णदुर्ग). या बारा दुर्गांपैकी एक साकार प्रतिकृती तयार करावी लागणार आहे. 12 गड दुर्गांपैकी कोणताही एक बनवावा- गडदुर्गाचा आकार किमान दोन फूट असावा.- सेल्फी मध्ये गड दुर्गाचा जास्तीत जास्त भाग दिसावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT