Mahad storm damage Pudhari
रायगड

Mahad storm damage: महाड तालुक्याला वादळी पावसाने झोडपले

शहरातील विद्युत पुरवठा खंडित

पुढारी वृत्तसेवा

महाड: मागील तीन दिवसात दुसऱ्यांदा काल दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या शहरासह तालुक्यातील वादळी अवकाळी पावसाने तालुक्याच्या चांभार खिंड ,चांडवे खुर्द व कांबळे तर्फे महाड या गावातील 20 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाल्याची प्रामिक माहिती हे वृत्त लिहित असताना सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे.

दरम्यान महाड शहरातील चांदेक्रीडांगण परिसरात व शहराच्या विविध भागात झाडे उन्मळून पडल्याने तर नवे नगर येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात एका घराचे पत्र्याचे छप्परच येऊन पडल्याचे निदर्शनास आले असून सुदैवाने या सर्व ठिकाणी कोणतीही दुखापत अथवा जीवित हानी झाली नसण्याची माहिती महाड आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून देण्यात आली .

यासंदर्भात महाड तहसील कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,मौजे चांभारखिंड येथे आज झालेल्या पाऊस व वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे व पडून अशंत नुकसान झाले आहे. चांढवे खुर्द येथे आज झालेल्या पाऊस व वाऱ्यामुळे संदीप भागुराम पवार व काही घरांचे पत्रे व पडून अशंत नुकसान झाले आहे.

तर मौजे कांबळे तर्फे महाड येथे अवकाळी पावसामुळे अंजना मुकेश महाडिक, शशिकांत मारुती तांबे, अंकुश रामचंद्र महाडिक, सुंदर भागोजी महाडिक, विनोद विठोबा महाडिक ,राघोबा बजरंग महाडिक, शुभम भगवान तांबे, सुरेश तांबे,सचिन शिर्के,सुनीलघोलप,रितेश,महाडिक,किसन महाडिक,राम तांबे, वर्षा जाधव,प्रकाश तांबे, चंद्रकांत मोरे,सोपान तांबे यांचे नुकसान झाले आहे कोणती ही जीवित हानी झाली नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान दुपारनंतर महाड शहरात झालेल्या या अवकाळी चक्रीवादळामुळे परांजपे हायस्कूल परिसरात झाड कोसळून तीन विद्यूत पोल कोसळले यामुळे परिसरातील विदियूत पुरवठा खंडित झाला असून, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, नगरसेवक हेमंत चांदलेकर संकेत वारंगे यांनी घटनास्थळी भेट दिली,महावितरणचे कर्मचारी यांनी देखील या ठिकाणी पोल उभे करण्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू केले आहे.

शहरासह तालुक्याच्या विविध भागातून झालेल्या घटनांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT