CCTV Camera Pudhari
रायगड

CCTV Cameras: महाड शहरातील ‌‘तिसरा डोळा‌’च झालाय बंद

शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित होणे गरजेचे!!

पुढारी वृत्तसेवा

महाड: महाड शहरात एकाच दिवशी घडलेल्या तीन धाडसी दुकानफोडींच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाला अखेर कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतील दुकानांचे शटर फोडून चोरीचा केलेला प्रयत्नाने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गंभीर पार्श्वभूमीवर शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा नव्याने बसवण्याचे काम नगरपालिकेपर्यंत सहा महिने पूर्वीच मंजूर करण्यात आले होते.

या संदर्भात नगरपालिका सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार शहराच्या प्रमुख 110 ठिकाणी सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून हा उपक्रम राबविण्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत.

मागील आठवड्यात शहरातील तीन ज्वेलर्स च दुकानांवर टाकण्यात आलेल्या दुकान फोडी दरम्यान सुदैवाने ऐवज गेला नसला तरीही या संदर्भात या दुकानात नजीक असलेल्या पैकी एकाच ज्वेलर्सच्या जवळील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले होते. या कारणाने, तपास करण्या कामी आवश्यक असलेले पुरावे मिळण्यात अडथळे येत असून गुन्हेगारांना मोकळे रान मिळाल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

याचबरोबर रात्रीच्या गस्तीत मोठी वाढ करून संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांनीही स्वतःहून सक्षम सुरक्षा यंत्रणा उभारण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे प्रशासनाने स्पष्टपणे बजावले आहे.

शहरातील सुरक्षेविषयी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम इशारा देत पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांविरोधात कठोर मोहिम राबवण्याचे संकेत दिले आहेत.

प्रशासनाकडून गंभीर दखल

प्रशासन व पोलिसांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तात्काळ ऑडिट करून उच्च प्रतीचे कॅमेरे बसवणे आणि प्रत्येक संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त देखरेख व्यवस्था उभारणे यासंदर्भात कठोर निर्देश देण्यात आले. तसेच, नियंत्रण कक्षातून 24 तास प्रभावी मॉनिटरिंग ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT