NCP Shiv Sena Political Clash Mahad Pudhari
रायगड

Mahad Violence Case | महाड हाणामारी प्रकरणातील तीन संशयितांना 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबईतील सहारा पोलिसांच्या मदतीने दोघांना विमानतळ परिसरातून अटक

पुढारी वृत्तसेवा

NCP Shiv Sena Political Clash Mahad

महाड : महाड नगरपरिषदेच्या दोन डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक २ व ३ मधील शाळा क्रमांक ५ समोरील रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 27 डिसेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असल्याची माहिती महाड शहर पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

महाड शहर पोलीस ठाण्याने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गुन्हा रजिस्टर क्रमांक 178/25 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक रायगड (अलिबाग) व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी महाड यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती.

पहिले पथक मुंबई व ठाणे परिसरात रवाना करण्यात आले होते. तांत्रिक तपास व मोबाईल लोकेशनच्या आधारे प्रतीक प्रताप शिंदे (वय 33, रा. प्रभात कॉलनी, महाड) आणि प्रतीक नरेश पवार (रा. नागलवाडी, महाड) हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई ते गोवा प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहारा पोलीस ठाणे, मुंबई यांच्या मदतीने या दोघांना विमानतळ परिसरातून ताब्यात घेऊन महाड शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

दरम्यान, दुसऱ्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील संशयित अमित अशोक कदम (रा. नागलवाडी, महाड) हा त्याच्या राहत्या घरी आल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यालाही ताब्यात घेऊन महाड शहर पोलीस ठाण्यात आणले. या तिन्ही संशयितांना 27 डिसेंबर 2025 रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना 29 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT