नाते : किल्ले रायगड येथून पुण्याकडे निघालेल्या खाजगी बसला महाडच्या हद्दीवर घरोशीवाडी येथे रविवारी (दि.20) दुपारी चारच्या सुमारास अपघात झाला. यात बसमधील 11 जण जखमी झाल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली.
सदर अपघाताचे वृत्त समजतात महाड तालुका पोलीस स्टेशन आणि पाचाड पोस्ट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना तातडीने प्राथमिक केंद्रामध्ये आणले. पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शैलेश मालदे यांनी जखमी प्रवाशांबद्दल माहिती दिली. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 32 प्रवासी गाडीतून प्रवास करीत होते. या अपघातात अनिकेत आघाड, किरण पाटील, आशिष अंभोरे, तुकाराम चोपडे, भीमा कांबळे, तुळशीराम ,शिवाजी जाधव, जानव्ही पारकर, माधुरी ठोबल, तेजस पाटील, दिव्या आदींचा समावेश आहे.