महाड शहरासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली  Pudhari
रायगड

Unseasonal Rain in Raigad | महाड–पोलादपूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

अवकाळी पावसाची विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी

पुढारी वृत्तसेवा

Mango Crops Damage Raigad

महाड : महाड शहरासह परिसरात गुरुवारी (दि.२३) दुपारी साडेचार ते पाच या वेळेत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळपासूनच तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याने सायंकाळी पावसाची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. दुपारी साडेचारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस काही काळ मुसळधार स्वरूपात कोसळला. मात्र, प्राथमिक माहितीनुसार महाड शहरात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

पोलादपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पोलादपूर शहर आणि तालुक्यात अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रखर उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कशेडी घाट आणि आंबेनळी घाट परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या अवकाळी पावसाचा फटका आंबा बागायतदार आणि वीटभट्टी व्यावसायिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी वृत्त लिहिताना कोणतेही ठोस नुकसान समोर आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT