29 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला  File Photo
रायगड

Mahad violence case : 29 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

महाड हाणामारी प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

महाड ः महाड नगरपालिका निवडणुकीत झालेल्या हाणामारी प्रकरणी महेश गोगावले, सुशांत जांभरे यांच्यासह अन्य 29 जणांचा अटकपूर्ण जामिनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. 2 डिसेंबला महाड मतदानाच्या दिवशी नगरपालिका शाळा क्रमांक पाचच्या रस्त्यावर हाणामारीची घटना घडली होती.

या हाणामारी संदर्भात मागील आठवड्यात माणगाव सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोन्ही बाजूंकडून मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्वक अर्ज दाखल करण्यात आले होते. न्या माधव जामदार यांच्यापुढे यावर सुनावणी झाली. यावळी महेश गोगावले यांच्यावतीने ॲड. हर्षद भडभडे यांनी सुमारे अर्धा तास केलेला युक्तिवादानंतर न्यायमूर्तींनी विकास गोगावले यांच्यावर असलेले गुन्हे लक्षात घेता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करता येत नाही असे सांगितले.

विकास गोगावले यांच्यासह अन्य आरोपींचे अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने नामंजूर केलेले असल्याने आता मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या पुत्राला पोलिसांच्या हवाली करावे,अशी मागणी सरपंच सोमनाथओझर्डे यांनी महाड येथे पत्रकार परिषदेत केलेली आहे. यासंदर्भात हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुशांत जाभरेंकडे काही व्यक्तींकडून केले जात आहेत.

यामध्ये पोलीस यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी सामील असल्याचा गौप्यस्फोट ओझर्डे यांनी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला तरीहीआपण या संदर्भात कायदेशीर बाजू मांडण्याचा विचार करीत असल्याचे नमूद केले.प्रतिवर्षी वर्ष अखेरीस गोगावले कुटुंबीय शेवटचे तीन दिवस विविध ठिकाणी देवदर्शनास जातात. त्यावेळी विकास गोगावले त्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे अशी सूचना त्यांनी केली. आपण या संदर्भात घेत असलेला संदर्भ हा कोणाच्या व्यक्तिगत नसून विकास गोगावले यांनी आपल्यावर काही वर्षांपूर्वी केलेले हल्ल्या च्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये दहशतवाद निर्माण होऊ नये यासाठी असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

सोमनाथ ओझर्डे यांनी सोमवारी झालेल्या मुंबई न्यायालयातील या सुनावणी प्रसंगी आपण स्वतः उपस्थित असल्याचे नमूद केले. यावेळी न्यायमूर्तीने रायगड पोलिसांनी संबंधित गुन्ह्यातील एक आरोपी हा राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा मुलगा असूनही गुन्हा दाखल करण्याचे धाडस केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी ओझर्डे यांनी मंत्री भरत शेठ गोगावले हे राज्यातील मंत्रिमंडळातील सदस्य असून त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात आपल्या मुलाला स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT