Mahad Nagar Parishad result 2025 file photo
रायगड

Mahad Nagar Parishad result 2025: महाड नगरपरिषदेवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला; सुनील कविस्कर विजयी! पाहा कोणाला किती मते?

महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मागील तीन दशकांपासून प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेने (शिंदे गट) महाडकर मतदारांच्या साथीने एक हाती लढत देत नगरपरिषदेवर भगवा फडकवला.

पुढारी वृत्तसेवा

Mahad Nagar Parishad result 2025

महाड : सुमारे ४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या ऐतिहासिक महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मागील तीन दशकांपासून प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेने (शिंदे गट) महाडकर मतदारांच्या साथीने एक हाती लढत देत नगरपरिषदेवर भगवा फडकवला. या निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर यांनी आपले प्रतिस्पर्धी सुरेश कलमकर यांच्यावर 692 मतांनी मात करून नगराध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत.

महाडकारांनी दिलेल्या या भूतपूर्व प्रतिसादाबद्दल मंत्री भरत गोगावले यांनी हा विजय गोगवल्यांचा नसून शिवसेनिक युवा सेना, महिला आघाडी यांसह सर्व महाडकरांचा असल्याचे सांगून निवडणूक काळामध्ये महाडकरांना दिलेला विकासाचा शब्द आपण मागे पडणार नाही याबाबत दक्षता घेऊ, अशी ग्वाही दिली. तर, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी आजचा हा अभूतपूर्व विजय मंत्री भरत गोगावले यांना महाडकर नागरिकांकडून देण्यात आलेली अनोखी भेट असल्याचे नमूद केले. यापुढे युवानेते विकास गोगावले व मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली महाडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

या निवडणुकीसाठी एकूण 23 हजार 124 मतदारांची नोंद करण्यात आली होती त्यापैकी 16,426 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.

एकुण मतदान- 16425

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

सुनील कविस्कर- 8091 विजयी (शिवसेना)

सुदेश कळमकर- 7399 (राष्ट्रवादी काँग्रेस)

चेतन पोटफोडे- 504 (शिवसेना ठाकरे गट)

गणेश कारंजकर- 301 (अपक्ष)

पराग वडके- 29 (अपक्ष)

नोटा- 100

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT