महाड : 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान शाळा क्रमांक पाच बाहेरील रस्त्यावर राष्ट्रवादी व शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. या प्रकरणी आज महाड न्यायालयात गुन्हा रजिस्टर नंबर 178 नुसार दाखल करण्यात आलेल्या आठ शिवसेनेच्या विकास गोगावले व अन्य सात जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे तर 179 गुन्हा रजिस्टर नुसार राष्ट्रवादीच्या हनुमंत जगताप व उर्वरित चार जणांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती महाडचे डीवायएसपी शंकर काळे यांनी दिली आहे.
22 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणासंदर्भात दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर 23 जानेवारी रोजी दोन्ही बाजूं कडील आरोपी महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते यामध्ये शिवसेनेचे आठ राष्ट्रवादीचे पाच जणांचा समावेश होता दिनांक 23 रोजी महाड न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आज त्यांना सायंकाळी सहाच्या सुमारास हजर केले असता न्यायालयाने वरील प्रमाणे आपला निर्णय जाहीर केला. याच केस संदर्भात गुन्हा रजिस्टर 179 नुसार असणारा प्रमुख आरोपी सुशांत जाभरे यांसह अन्य चार जणांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.