River Water Pollution Raigad  pudhari photo
रायगड

River Water Pollution Raigad : जिते हद्दीतील नदीपात्रात रासायनिक प्रदूषण

प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने कारवाई करावी; ग्रामपंचायतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाते : महाड औद्योगिक वसाहती मधील माजी काही महिन्यात नदीपात्रात केमिकल सोडण्याच्या प्रकारात वाढ होत असून आज जिते ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नदीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल सोडण्यात आल्याच्या तक्रारी लेखी स्वरूपात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.

या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे स्पष्ट करून सदर नदीमध्ये गुरे व इतर प्राणी पाण्यासाठी जात असतात तसेच त्यांच्या जीवित आज धोका असून गावाच्या प्रवेशद्वारावर दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थांना सुद्धा त्याचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नदीची झालेली दुर्दशा ग्रामस्थांना परवडणारी नसल्याचे या लेखी पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

  • प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी म्हात्रे यांना विचारणा केली असता त्यांनी नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असून संबंधित ठिकाणचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणी करता पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

  • पावसाळ्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या रसायनानंतर आता सध्याच्या संभाव्य दुष्काळी स्थितीमध्ये नदीपात्रात अशा पद्धतीने केमिकल सोडल्यास त्याचा मोठा फटका परिसरातील नागरिकांना तसेच गुरांना बसण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने व स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित कारखान्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थां मार्फत केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT