महाड : श्रीकृष्ण बाळ
महाड शहराच्या इतिहासात मागील शंभर वर्षातील सर्वात मोठी भीषण बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जुना पोस्ट परिसरातील संजय ऑइल ट्रेडिंग कंपनी च्या गोदामाला लागली.
सुमारे सात तासाच्या प्रयत्नानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याची माहिती महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व एमआयडीसीचे फायर स्टेशन प्रमुख यांनी पुढारीशी बोलताना दिली आहे.
गेल्या अनेक दशकापासून जुना पोस्ट परिसरात व्यवसाय करणाऱ्या संजय यावेळी ट्रेडिंग या कंपनीच्या गोदामामध्ये जेमिनी तेल व सेउल माचिस चा साठा ठेवण्यात आला होता.
रात्री साडेबाराच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांच्या आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने नगरपालिका अग्निशमन दलाला बोलवण्यात आले दहा मिनिटाच्या नगरपालिका बंबाने आपले कामे सुरू केली.
त्या पश्चात महाड एमआयडीसीचे दोन टँकर बिर्ला, लक्ष्मी, विनती व प्रिव्ही कंपनीच्या फायर फायटरसह माणगाव नगरपंचायतीचा फायर टॅंकर ही तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने सुमारे 25 फायर फायटर मधून एक लाख दशलक्ष लिटर पाण्याचा वापर केल्यानंतर ही सात तासानंतर आज आटोक्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवताना सुदैवाने कोणीही जखमी झाल्याची वृत्तप्राप्त झालेले नाही.
यादरम्यान सिलेंडरच्या झालेल्या मोठ्या स्फोटानंतर व घरातील एक भिंत कोसळल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.
आगीची भीषणता लक्षात घेऊन गोदामातील असलेले मोठ्या प्रमाणातील ज्वलनशील पदार्थ बाहेर काढण्यात महाडकर नागरिकांनी दाखवलेल्या धैर्य कौतुकास्पद असून जीव धोक्यात घालून आपल्या शेजारील व्यवसायाची अधिक प्रमाणात होणारी हानी टाळण्याकरता केलेल्या प्रयत्नांचे महाडकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मंत्री भरत शेठ गोगावले यांनी पहाटे तीन वाजता आपल्या दौऱ्यातून परत येत असताना या भीषण आगीचे वृत्त समजतात तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आपल्या सहकाऱ्यांकडून केला जाणाऱ्या कामांचे कौतुक करताना प्रशासकीय यंत्रणांना देखील अधिक गंभीरपणे या गोष्टीकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
आगीचे वृत्त समजतात सर्वप्रथम धावत येणाऱ्या महाडकर नागरिकांना व त्यानंतर आग पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दी व नियंत्रण मिळवत असताना स्थानिक महाडकर नागरिक व पोलिसांची एक दोन ठिकाणी बाचाबाची झाल्याची माहिती निदर्शनास आली आहे.
एकूणच महाडच्या मागील शंभर वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी भीषण असून या आगीमुळे महाड शहरात होणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा पद्धतीच्या असलेल्या गोदामांना अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणांनी सिद्ध करणे हे बंधनकारक करावे व त्यानंतरच बाजारपेठेमध्ये अशा व्यवसायांना जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी महाडकर नागरिकांकडून केली जात आहे.
यासंदर्भात महाड नगर परिषद आगामी काळात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.