महाडच्या चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण करणार  pudhari photo
रायगड

Mahad Chavdar Tale | महाडच्या चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण करणार

72 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करणार

पुढारी वृत्तसेवा

महाड : महाड शहरातील चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्याकरणाच्या कामासाठी 7 कोटी रुपयांचा असा एकूण 72 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. नवीन प्रस्तावानुसार चवदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतील, असेही म्हणाले.

याबाबत आ. संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अनिल देशमुख, किशोर जोरगेवार, यांनी उपप्रश्न उपस्थित केले. मंत्री उदय सामंत म्हणाले की, चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी ऑरगॅनिक बायोटेक कंपनीकडून दरमहा मायक्रोबाएबल कल्चरचे मिश्रण तलावात सोडून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित असून अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोनवर आधारित प्रक्रिया करुन चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. प्रस्तावाला 15 दिवसात उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. चवदार तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल व दुरुस्ती न.प.ेच्या स्व-निधीतून व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येते. रत्नागिरीतील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी प्रथमच शासकीय जयंती साजरी करण्यात आली असून तेथे स्मारक उभारणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

नगरपरिषदेचे नियोजन

चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम करण्याच्या दृष्टिकोनातून आ. प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रथ दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्री यांनी, महाड न.प.ने चवदार तळयाचे सुशोभिकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालास प्राप्त झाल्यानंतर तळे व परिसराचे सौंदर्याकरण करण्याचे नगरपरिषदेचे नियोजन आहे असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT