Mahad fire news file photo
रायगड

Mahad news: महाडच्या चवदार तळ्यावरील आईस्क्रीम दुकानाला भीषण आग

महाड शहरातील चवदार तळे परिसरात मध्यरात्री उशिरा एका आईस्क्रीम आणि डेअरी उत्पादने विक्री करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली.

पुढारी वृत्तसेवा

Mahad fire news

महाड : महाड शहरातील चवदार तळे परिसरात मध्यरात्री उशिरा एका आईस्क्रीम आणि डेअरी उत्पादने विक्री करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती नगरपरिषद अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यामुळे ही आग परिसरातील इतर दुकानांपर्यंत पसरण्याची मोठी दुर्घटना टळली.

या आगीचे प्राथमिक कारण 'शॉर्ट सर्किट' असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीचे अधिकारी, नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यांच्याकडून रविवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT