माजी सरपंचांचा मृत्‍यू  
रायगड

महाड : सुंदरवाडी जवळ अपघात; खरवलीच्या माजी सरपंचांचा मृत्‍यू

निलेश पोतदार

महाड ; पुढारी वृत्‍तसेवा मागील महिन्याभरापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान सुंदरवाडी जवळ झालेल्या अपघातामध्ये महाड तालुक्यातील काळीज खरवली गावचे माजी सरपंच विठ्ठल उर्फ प्रमोद महामुणकर यांचे अपघाती निधन झाले. याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या अपघाता संदर्भात महाड वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुंदरवाडी येथून आपल्या गावी बिरवाडी एमआयडीसीकडे विठ्ठल उर्फ प्रमोद महामुणकर आपल्या बजाज मोटरसायकल वरून जात होते. यावेळी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टाटासेस गाडी क्रमांक एम. एच. झिरो तीन सीपी 4469 या गाडीला झालेल्या जोरदार टकरीमध्ये विठ्ठल महामुनकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अपघातांची संख्या पाहता, अपघात टाळण्यासाठी आणि अशा अपघातांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT