रायगड

Mahad Accident : महाडमध्ये मुंबई महाबळेश्वर एसटी बसचा अपघात; १९ प्रवासी जखमी

backup backup

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड (Raigad) शहरानजीक नाते खिंड परिसरात मुंबई-महाबळेश्वर एस टी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. डंपर आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन १९ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील एका महिला गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी (दि. ९) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. (Mahad Accident)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई महाबळेश्वर (Mumbai-Mahabaleshwar) या एस टी बसचा (ST Bus : क्र. एम एच १४ बीटी ३०८२) चालक आप्पा पोपट चव्हाण व वाहक उमेश दत्तात्रेय शिंगटे हे मुंबईहून येत होते. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान महाड शहरानजिक नाते खिंड येथील फ्लाय ओव्हरवर ही बस आली असता समोरून येणारा डंपरची (क्र एम एच ०६ बी व्ही ५२००) बसला समोरून धडक बसल्याने झालेल्या अपघातात बस मधील १९ प्रवाशांना लहान मोठ्या दुखापती झाल्या आहेत. (Mahad Accident)

सुदैवाने ही बस डंपरची धडक बसल्याने संरक्षक कठड्या जवळ जाऊन पडल्याने मोठी दुर्घटना टळली. लग्नसराई असल्याने मुंबईहून आपल्या गावी येणार्‍या आणि ५० टक्के सवलत असल्याने महिलांची संख्या बसमध्ये जास्त होती. एकुण ४८ प्रवासी बसमधून प्रवास करीत होते. जखमींमध्ये शरयु अनंत कासार ( वय २०) रा. मुंबई गोरेगांव, एल्यादर रहिमदुन कुवारे (वय३५), ओद्रारा अब्दुल कुवारे ( वय ३८), मोअज्जम अब्दुल कुवारे ( वय ७ ), अलमाज आसिफ कुवारे ( वय ३६), अब्दुल रेहमान आसिफ कुवारे ( वय ७ ) सर्व रा. नागोठणे ता. रोहा, शांती दगडू भोसले (वय ६५) , प्रणिता नरेश महानंद (वय३५) , आदिती आदेश भोजने (वय ३५)रा. देवळी ता. माणगांव, उमेश बळीराम खैर, (वय ४२ ) रा. कोलाड रोहा, विमल महेश शिगवण ( वय ४०), नमिता गोविंद वाघमारे, रा. तळेगांव माणगांव, लतिका लक्ष्मण शिंदे ( वय ४५ ) रा. सायन मुंबई, सविता सखाराम शिर्के (वय५०) रा. चिंचवली गोरेगांव ता.माणगाव, राजू धोंडू देवरुखकर ( वय ४०) रा. तुळशी मंडणगड, अजय विजय काणेकर ( वय३५) रा. सिद्धार्थ नगर ठाणे, सुशिल सुदाम रसाळ, रा. चेंबुर, अजित बाळ पाटील ( वय ५१ ) रा.पेण, सुनिल सुदाम रसाळ, रा. सापे रावढळ यांचा समावेश आहे. या जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी सविता शिर्के यांच्या हात व पायाला फ्रॅक्चर असल्याने त्यांना डॉ. रानडे यांचे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT