महाड : निवडणूक विभागाकडून वाढीव पुरवणी मतदार नोंदणीसह नवीन मतदार मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून 194 महाड विधानसभा मतदारसंघात 1 लाख 47 हजार 224 पुरुष मतदार तर 1 लाख 49 हजार 164 महिला मतदारांच्या नोंदणीसह एकूण 2 लाख 96 हजार 388 मतदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या मतदारसंघात एकूण 393 मतदान केंद्रे असून मतदानासाठी 471 बॅलेट युनिट, 471 कंट्रोल युनिट आणि 510 व्हीव्हीपॅटचे हे वाटप निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे तसेच मतदारसंघात 1 हजार 740 मनुष्यबळाची उपलब्धता प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
194 महाड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे हे काम पहात आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुमार एस यांनी सर्व निवडणूक प्रशासकीय यंत्रणेला मतदारसंघात पारदर्शकतेने व नि:पक्षपातीपणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.