Raigad accident Pudhari Photo
रायगड

Raigad accident: मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पडून तरुणीचा मृत्यू; गोवे गावाजवळ भीषण अपघात

Train passenger fall death latest accident news: या अपघातानंतर प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

विश्वास निकम

कोलाड: मुंबईहून मंगळूरकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पडून 30 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. गोवे गावाच्या हद्दीत, रेल्वे पोल क्र. ७/३५ जवळ पटरी रेल्वेतून पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सविता हिरालाल मखवाना (वय-वर्षे ३०) ती रा.मेघानी,नगर शेरी-७, रणपूर अमहदाबाद, गुजरात येथील रहिवासी आहे. या महिलेचा तोल जाऊन ती रेल्वेतून खाली पडली. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते, पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू (SVRSS) टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस. जी. भोजकर करीत आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT